ठाणे -कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होण्याचे नाव घेत नसताना ठाण्यातील आरोग्य सेवाच व्हेंटिलेटरवर आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे हॉस्पिटल, बेड व रुग्णांना अन्य सेवा मिळण्यात अडचणी उद्भवत असल्याने ठाणे महापालिकेने वॉररूम उभारली. मात्र, पालिकेच्या या वॉररूममध्ये कुणीही दखल घेत नसल्याच्या तक्रारी वाढल्याने वॉररूम कुचकामी ठरले. त्यामुळे मनसेने थेट महापलिकेचे वॉररूम गाठले आणि उपस्थित कर्मचाऱ्यांचा याचा जाब विचारला. दरम्यान कुचकामी वॉररूमचा कारभार 2 दिवसांत सुधारा अन्यथा वॉररूम तोडून टाकू, असा इशारा यावेळी मनसेचे ठाणे अध्यक्ष रवींद्र मोरे यांनी यावेळी दिला.
ठाणे पालिकेच्या वॉररूममध्ये मनसेचा राडा, यंत्रणा कुचकामी असल्याचा आरोप - corona in thane
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होण्याचे नाव घेत नसताना ठाण्यातील आरोग्य सेवाच व्हेंटिलेटरवर आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे हॉस्पिटल, बेड व रुग्णांना अन्य सेवा मिळण्यात अडचणी उद्भवत असल्याने ठाणे महापालिकेने वॉररूम उभारली.
वॉर रूम विरोधात नागरिकांच्या अनेक तक्रारी-
ठाणे शहरात रुग्णाची संख्या दिवसेंदिवस वाढली असुन नागरिकांना बेडसाठी वणवण भटकावे लागत आहे. गेल्यावर्षी कोरोनाच्या संकटात ठाणे महापालिका सज्ज होती. परंतु यावेळची परिस्थिती खूप भयावह आहे. पालिकेकडील रुग्णसंख्यची नोंद पाहता दररोज हजारोंच्यावर आहे. रुग्णांना बेड मिळणे अवघड झाले आहे. या सर्व कोविडच्या यंत्रणेवर लक्ष ठेऊन काम सुरळीत चालावे. यासाठी ठाणे महापालिकेने वॉररूम स्थापन केले. परंतु या वॉररूम विरोधात नागरिकांच्या अनेक तक्रारी पुढे येत आहेत. रुग्णांची बेडची स्थिती, लागणारे इंजेक्शन, रुग्णांचा रिपोर्ट या संदर्भात हे वॉररूम कूचकामी ठरत असल्याचे दिसून येत आहे. यालाच उत्तर देत मनसेकडून मदत कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. या कक्षाच्या माध्यमातुन वॉररूमशी संपर्क साधुन तातडीने नागरिकांच्या समस्यांचा निवारण केले जात आहे. मात्र, मनसेच्या या मदत कक्षाला आक्षेप घेतला जात असुन वॉररूमची देखरेख करणाऱ्या डॉ. खुशबू यांनी, मनसे सोबत काम करणार नसल्याचे कळवले आहे.
लोकांना थेट इंजेक्शन मिळत नाहीत. काही राजकीय पक्षांचे पदाधिकारी आपापल्या कार्यकर्त्याना इंजेक्शन वाटत असल्याने संताप व्यक्त होत आहे. तेव्हा, कुचकामी वॉररूमचा कारभार सुधारा अन्यथा मनसे स्टाईल धडा शिकवू, असा इशारा अविनाश जाधव यांनी दिला आहे.
मनसेच्या वतीने रुग्णांना तात्काळ सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी वॉररूम तयार करण्यात आली आहे. सत्ताधारी शिवसेनेलाही बाब सहन न झाल्याने वॉर रूमच्या प्रमुखांकरवी मनसेला दटावण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप मनसेचे रवींद्र मोरे यांनी केला आहे.
हेही वाचा-हवेतून ऑक्सिजन निर्माण करणाऱ्या प्लांटला पालकमंत्री बच्चू कडू यांनी दिली मंजुरी