मुंबई - लोकसभा निवडणुकीनंतर मनसे विधानसभा निवडणुकीसाठी सज्ज झाली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. दुसरीकडे राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांनी नवी मुंबईत पक्षबांधणीचे काम जोरात सुरू केले. नुकतेच नवी मुंबईत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने पाच शाखांचे उद्घाटन अमित ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. सीवूड्स, तुर्भे, कोपरखैरणे आणि घणसोली येथे मनसेच्या शाखा उभारून सर्वसामान्य जनतेच्या समस्या मार्गी लावण्याचे काम उत्साहात सुरू झाले आहे.
नवी मुंबईत पक्ष बांधणीसाठी मनसेचे इंजिन सुसाट; अमित ठाकरेंच्या हस्ते शाखांचे उद्घाटन - अमित ठाकरे
विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीचा अनुभव पाठीशी असलेली राज ठाकरेंची टीम सध्या कंबर कसून येत्या विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सर्वच जिल्ह्यात स्थानिक स्तरावर पक्ष विस्तार करण्याचे आदेश दिले आहेत. नवी मुंबईत मनसेची संघटना बांधणी तळागळापर्यंत पोहोचलेली आहे.
विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीचा अनुभव पाठीशी असलेली राज ठाकरेंची टीम सध्या कंबर कसून येत्या विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सर्वच जिल्ह्यात स्थानिक स्तरावर पक्ष विस्तार करण्याचे आदेश दिले आहेत. नवी मुंबईत मनसेची संघटना बांधणी तळागळापर्यंत पोहोचलेली आहे. याच धर्तीवर नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी मनसेच्या विभागा विभागात शाखा सुरु करण्याचा कार्यक्रम हाती घेतला आहे. सीवूड्स येथे विभाग अध्यक्ष अमोल आयवळे यांच्या शाखेचे, तुर्भे येथे उपशहर अध्यक्ष विनोद पार्टे यांच्या शाखेचे, सेक्टर-१५ कोपरखैरणे येथे सचिव आचरे यांच्या शाखेचे, घणसोली येथे उपशहर अध्यक्ष संदीप गलुगडे यांच्या शाखेचे आणि सेक्टर-२ कोपरखैरणे येथे शाखा अध्यक्ष चंद्रकांत डांगे यांच्या शाखेचे उद्घाटन स्वतः अमित ठाकरे यांनी केले.
यावेळी अमित ठाकरे यांनी सर्व मनसैनिकांशी संवाद साधून त्यांची मत जाणून घेतले. त्यामुळे पक्ष बांधणीत मनसेचे रेल्वे इंजिन सुसाट असल्याचे चित्र आहे. नवी मुंबई शहरात पक्षाची ताकद वाढवण्यासाठी शहर पातळीवरून प्रयत्न केले जात आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून पक्षाच्या विविध पदांवर पदाधिकार्यांच्या नियुक्त्या केल्या जात आहेत. विधानसभा निवडणुकीचे उद्दिष्ट्ये डोळ्यासमोर ठेवून चांगला निकाल देण्यासाठी आतापासून पक्षाने बांधणी सुरू केली आहे. या वेळच्या विधानसभा निवडणुकीतही निर्णायक भूमिका बजावणार असल्याचा चंग पक्षाने बांधला आहे.