ठाणे -महापालिकेच्या 2017 मध्ये झालेल्या निवडणुकीत सत्ताधारी शिवसेनेने 500 चौरस फुटांच्या घरांना करमाफी देण्याचे वचन दिले होते. त्याला तब्बल साडेचार वर्षांनी मुर्तस्वरुप आल्याचे दिसत आहे. गुरुवारी (दि. 18) झालेल्या महासभेत 500 चौरस फुटांच्या घरांना करमाफी देण्याचा ठराव मांडण्यात आला आणि त्याला मंजुरी दिली. पण, कोरोनामुळे पालिकेची सध्याच्या आर्थिक स्थिती पाहता, हा ठराव किती तग धरणार हे पाहणो महत्वाचे ठरणार आहे. महापालिकेच्या निवडणुकीला तीन महिन्यांचा अवधी राहिला असताना शिवसेनेला वचननाम्याची आठवण झाली आहे. ठाणेकर मतदारांना भुलविण्यासाठी हा `चुनावी जुमला' तर नव्हे, असा टोला भाजपचे गटनेते मनोहर डुंबरे यांनी लगावला आहे.
मतदारांना भुलवण्याचे सेनेचे काम
या करमाफीवर मनसेनेही शिवसेना ही फक्त आश्वासन देते. मात्र, आश्वासन पूर्तता करत नसल्याचा आरोप केला आहे. निवडणुकांपूर्वी ठाणेकर मतदारांना भुलवण्याचे काम शिवसेना करत असल्याचा आरोपही मनसेचे ठाणे-पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी केला.