महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन रद्द करून निधी पूरग्रस्तांना द्या, मनसेसह भाजपची मागणी - मॅरेथॉन रद्द करून निधी पूरग्रस्तांना

मॅरेथॉनसाठी प्रायोजकांकडून मिळणाऱ्या रक्कमेवरून आणि स्पर्धेसाठी भर रस्त्यात उभारण्यात येणाऱ्या व्यासपीठामुळे मॅरेथॉन स्पर्धा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. हे सर्व वाद टाळण्यासाठी आणि स्पर्धेवर होणारा खर्च पाहता ही रक्कम राज्यातील सांगली, सातारा, कोल्हापूर व कोकण जिल्ह्यातील पुरस्थितीचा फटका बसलेल्या सर्वसामान्यांच्या हितासाठी देण्यात यावी, अशी मागणी मनसे आणि भाजपने केली आहे.

ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन रद्द करून निधी पूरग्रस्तांना द्या मनसेसह भाजपची मागणी

By

Published : Aug 17, 2019, 9:47 AM IST

ठाणे - राज्यावर अस्मानी संकट कोसळले आहे. यामुळे यंदा होऊ घातलेली ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन रद्द करावी, अशी आग्रही मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना आणि भाजपने ठाण्याच्या महापौर मिनाक्षी शिंदे यांच्याकडे केली आहे. मॅरेथॉनच्या माध्यमातून होणारी 60 ते 75 लाखांची उधळपट्टी टाळून हा निधी पूरग्रस्तांच्या कल्याणासाठी वापरल्यास महापौरपदाचा संवेदनशीलपणा दिसून येईल. अन्यथा एकीकडे महाराष्ट्र ओल्या दुष्काळाने पिचून गेलेला असताना ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन आयोजित करणे, असंवेदनशीलतेचे प्रतीक मानले जाईल. असे मनविसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष संदीप पाचंगे आणि भाजपचे गटनेते नारायण पवार यांनी स्पष्ट केले.

ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन रद्द करून निधी पूरग्रस्तांना द्या मनसेसह भाजपची मागणी

ठाणे महापालिकेद्वारे दरवर्षी पावसाळ्यात आयोजित केली जाणारी ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन स्पर्धा वादाची स्पर्धा बनली आहे. यंदा तर पावसाने धुमाकूळ घातल्याने रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. यामुळे स्वतः महापौरदेखील दौरा अर्धवट सोडून आल्या होत्या. मॅरेथॉनसाठी प्रायोजकांकडून मिळणाऱ्या रक्कमेवरुन आणि स्पर्धेसाठी भर रस्त्यात उभारण्यात येणाऱ्या व्यासपीठामुळे मॅरेथॉन स्पर्धा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. हे सर्व वाद टाळण्यासाठी आणि स्पर्धेवर होणारा खर्च पाहता ही रक्कम राज्यातील सांगली, सातारा,कोल्हापूर व कोकण जिल्ह्यातील पुरस्थितीचा फटका बसलेल्या सर्वसामान्यांच्या हितासाठी देण्यात यावी. अशी मागणी मनसे आणि भाजपने केली आहे. यावर महापौर मिनाक्षी शिंदे यांनी, महापालिका प्रशासन पूरग्रस्तांसाठी संवेदनशील आहे. मॅरेथॉन स्पर्धेचा खर्च सर्वसाधारणपणे 40 लाख असून स्पर्धा अंतिम टप्यात आली आहे. महाराष्ट्रासह विविध ठिकाणच्या स्पर्धकांची नोंदणी देखील झालेली आहे. त्यामुळे स्पर्धा रद्द करण्यात अडचणी उद्भवू शकतात, असे त्या म्हणाल्या.

ABOUT THE AUTHOR

...view details