ठाणे - जिल्ह्यात विवीध शहरात पावसामुळे खड्डयांनी डोके वर काढले आहे. त्यातच भिवंडी तालुक्यातील मानकोली ते वसई-कामण-चिंचोटी फाटा राज्य मार्गावरील अंजुरफाटा ते खारबाव रस्ता खाजगिकरणातून बनवण्यात आला. मात्र, या राज्यमार्गाच्या खड्यांमुळे अत्यंत दुरावस्था झाली. याच खड्यांच्या राजकाणारात आता मनसेही रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेना ठाणे-पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी दिला आहे. येत्या चार दिवसांत या रस्त्याबाबत दुरुस्ती न केल्यास या रस्त्यावरील टोल वसुली कायमस्वरूपी बंद पडण्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला आहे.
केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी जिल्ह्यातील रस्त्यांच्या कामं ठेकेदारांमुळे निकृष्ट व संथगतीने होत असल्याचा आरोप केला होता. त्याचाच हवाला देत मनसेचे अविनाश जाधव यांनी राज्यसरकावर सडकून टीका केली आहे. ठाणे जिल्हा परिषद, पंचायत समितीमध्ये शिवसेनेची सत्ता असताना कोट्यवधी रुपये दुरुस्तीवर खर्च करून ही सामान्य नागरीकांना चांगले रस्ते का देत नाहीत. असा प्रश्न उपस्थित केला आहे.