महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

MMRDA Thane Office मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात डेप्युटी प्लॅनर लाच घेताना अटक; सखोल चौकशी झाल्यास बडे मासे अडकण्याची शक्यता - डेप्युटी प्लॅनर लाच घेताना अटक

MMRDA Thane Office राज्याचे मुख्यमंत्री असलेल्या एकनाथ शिंदे Chief Minister Eknath Shinde यांच्याकडे ज्या नगरविकास खात्याची जबाबदारी आहे, त्याच अंतर्गत येणाऱ्या एमएमआरडीए ठाणे कार्यालयात MMRDA Thane Office लाचखोरीने कळस गाठल्याचे आरोप होत होते. एकीकडे गणेशोत्सव धुमधडाक्यात सुरु असताना आणि याच कार्यलयातील वरिष्ठ पदावर कार्यरत असलेल्या डेप्युटी प्लॅनर शिवराज प्रकाश पवार यांना लाच घेताना रंगेहात अटक Arrested red handed while taking bribe करण्यात आल्याने मोठी खळबळ उडाली.

MMRDA Thane Office
MMRDA Thane Office

By

Published : Sep 2, 2022, 9:56 PM IST

ठाणे राज्याचे मुख्यमंत्री असलेल्या एकनाथ शिंदे Chief Minister Eknath Shinde यांच्याकडे ज्या नगरविकास खात्याची जबाबदारी आहे, त्याच अंतर्गत येणाऱ्या एमएमआरडीए ठाणे कार्यालयात MMRDA Thane Office लाचखोरीने कळस गाठल्याचे आरोप होत होते. एकीकडे गणेशोत्सव धुमधडाक्यात सुरु असताना आणि याच कार्यलयातील वरिष्ठ पदावर कार्यरत असलेल्या डेप्युटी प्लॅनर शिवराज प्रकाश पवार यांना लाच घेताना रंगेहात अटक Arrested red handed while taking bribe करण्यात आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे सुरवातीला लाचलुचपत अधिकाऱ्यांनी पडताळणी केली असता, पवार खुलेआम लाच मागत असल्याचे उघड झाले होते. त्यानंतर कार्यालयातच पंचासमक्ष लाच घेताना अटक करण्यात आली आहे.

मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार होत असल्याचे आरोप मुंबई , ठाणे , पालघर , रायगड जिल्ह्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण प्राधिकारी अथॉरिटी असून जिल्ह्यात कोणतेही विकास काम करायचे असेल, किंवा बांधकाम करायचे असेल, तर एमएमआरडीएकडून ना हरकत प्रमाणपत्र घ्यावे लागते. त्यामुळे अशी ना हरकत प्रमाणपत्रे मिळवण्यासाठी हजारो अर्ज या कार्यालयात येत असतात. Arrested red handed while taking bribe ठाणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शासकीय विकासकामे होत असतानाच गेल्या काही वर्षात नागरीकरण मोठ्या प्रमाणात वाढले, असल्याने इमारतीचे बांधकाम मोठ्या प्रमाणात सुरु आहे. याच अनुशंघाने ना हरकत प्रमाणपत्र मिळवण्यासाठी उपप्रादेशिक कार्यालय ठाणे येथे दररोज शेकडो अर्ज येत असतात. मात्र यावर उत्तर देताना अधिकाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार होत असल्याचे आरोप करण्यात येत होते. दरम्यान शिवराज पवार याला लाच घेताना रंगेहात अटक करण्यात आल्याने या कार्यालयाची लाचखोरी चव्हाट्यावर आली आहे.

अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दरम्यान यापूर्वीही या कार्यालयातील कामचुकार अधिकाऱ्यांना पाठीशी घालण्याचे काम वरिष्ठ पातळीवरून होत असल्याचे उघड झाले होते. गेल्या वर्षी शहरात ठिकठिकाणी रस्त्यांवर खड्डे पडले असताना कामचुकारपणा करणाऱ्या पालिकेच्या 4 अभियंत्यांना पालिकेचे आयुक्त डॉ.विपीन शर्मा यांनी तडकाफडकी निलंबित केले होते. Arrested red handed while taking bribe त्यावेळी इतर यंत्रणा म्हणजेच सार्वजनिक बांधकाम खाते, एमएसआरडीसी आणि एमएमआरडीएच्या संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश तत्कालीन पालकमंत्री आणि सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते. मात्र तरी एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांवर कोणतीच कारवाई झाली नव्हती.

सखोल चौकशी झाल्यास बडे मासे अडकणार ?या कार्यालयाची सखोल चौकशी झाल्यास गेल्या काही वर्षात झालेल्या मोठ्या लाचखोरीवर प्रकाश पडण्याची शक्यता असून यात बडे अधिकारीही सहभागी असल्याचे उघड होऊ शकते. त्यामुळे या कार्यालयातील लाचखोर अधिकारी त्यांचे वरिष्ठ अधिकारी यांच्या संपत्तीचीही चौकशी करण्यात यावी, अशी मागणी नागरिक करू लागले आहेत.

हेही वाचाDasara Melava दसरा मेळाव्यावर शिवसेना, शिंदे गट आमने सामने, पालिकेपुढे मात्र पेच

ABOUT THE AUTHOR

...view details