ठाणे : राज्यातील सत्तांतरानंतर पहिल्याच लागलेल्या अंधेरी पोटनिवडणूकीला Big secret explosion in Andheri byelection ) मोठे नाट्यमय वळण पाहायला मिळत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे ( MNS President Raj Thackeray ), राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार ( NCP leader Sharad Pawar ) यांच्यानंतर आता शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक ( MLA Pratap Saranaik ) यांनी देखील ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशी मागणी चक्क मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.
आमदार सरनाईक यांनी पत्रात काय म्हटले? आपले सर्वांचे मित्र रमेश लटके हे आपल्याला अचानक सोडून गेले आहेत. त्यामुळे त्यांच्या पत्नी ऋुतूजा लटके यांना बिनविरोध निवडून द्या, अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सरनाईक यांनी पत्रात म्हटले आहे. रमेश लटके यांनी शाखाप्रमुख ते नगरसेवक, आमदार असा प्रवास केला आहे. लटके यांनी पक्ष वाढवण्यासाठी खूप प्रयत्न केले. भाजपच्या नेत्यांशी चर्चा करुन लटके यांना बिनविरोध निवडून देण्याची विनंती सरनाईक यांनी आपल्या पत्रात केली आहे.
ऋतुजा लटके यांना काँग्रेसचा पूर्ण पाठिंबा : या मतदारसंघात १ लाख ५ हजार मराठी, ५७ हजार उत्तर भारतीय, ३३ हजार मुस्लिम, १९ हजार ख्रिश्चन व इतर गुजराती धार्मिक मतदार आहेत. मुंबई महानगरपालिकेचे ८ प्रभाग या विभागांमध्ये असून त्यातील ५ ठिकाणी शिवसेनेचा, २ ठिकाणी भाजप व १ ठिकाणी काँग्रेसचे नगरसेवक आहेत. संमिश्र असा हा विधानसभा मतदारसंघ असला तरी महत्त्वाचे म्हणजे काँग्रेसची २७ हजार ९५१ मतं जी मागच्या निवडणुकीत त्यांच्या उमेदवाराला भेटली होती. ती आपल्याकडे खेचण्याचा त्याचबरोबर ती मते ऋतुजा लटके यांना मिळण्यासाठी या विभागात ३ टर्म आमदार असलेले व माजी आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी हे सुद्धा मोठ्या प्रमाणात त्यासाठी प्रयत्न करणार आहेत.
ठाकरे गटाचा प्लॅन : या निवडणुकीत ऋतुजा लटके यांच्यासोबतच ठाकरे गटाकडून संदीप नाईक यांनीदेखील अर्ज भरला आहे. हा अर्ज भरण्यामागे निवडणुकीत ऐनवेळी कोणताही दगाफटका होऊ नये हे कारण असल्याचे अनिल परब यांनी सांगितले आहे. ऋतुजा लटके यांच्या निवडणूक अर्जात एखादी तांत्रिक अडचण दाखवून त्यांचा अर्ज बाद करण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे ठाकरे गटाकडून हा प्लॅन बी तयार ठेवण्यात आला आहे. त्यामुळे ऐनवेळी जरी निवडणूक आयोगाकडून काही तांत्रिक बाबी दाखवून ऋतुजा लटके यांचा अर्ज रद्दबातल ठरवल्यास संदीप नाईक हा ठाकरे गटाकडे पर्याय उपलब्ध असणार आहे.