ठाणेएसी लोकल सुरू झाल्यापासून प्रवाशांमध्ये संतापाची लाट पाहायला मिळत आहे. सुरवातीला कळवा, बदलापूर अंबरनाथ या ठिकाणी प्रवाशांकडून आंदोलन करण्यात आले होते. आता या संघर्षामध्ये राष्ट्रवादीचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी उडी घेतली असून रविवारी जितेंद्र आव्हाड यांनी प्रवाश्यांसोबत मुंब्रा रेल्वे स्थानकाबाहेर बैठक आयोजित केली होती. Jitendra Awhad called meeting on AC local issue Mumbra या बैठकीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. आव्हाड यांचे भाषण सुरू असताना आव्हाड यांनी शस्त्र धारी पोलीस हटवण्यास सांगितले नाही, तर आम्ही रेल्वे ट्रॅकवर आंदोलन करू असा इशारा दिला आहे.
जितेंद्र आव्हाडांचा इशाराआज ही सभा सुरू असताना जितेंद्र आव्हाड यांनी मी स्वतः तिथे येतो माझ्यावर गोळी चालवा, ट्रेन मधून पडून मरण्यापेक्षा गोळी चालवा असा आक्रमक पवित्र आव्हाड यांनी घेतला. मग त्या ठिकाणी तैनात असलेले शस्त्र धारी पोलीस बंदोबस्त तात्काळ प्रशासनाने हटवले. हे आंदोलन सर्वसामान्य जनतेच्या हक्कासाठी आहे. Jitendra Awhad called meeting on AC local issue Mumbra तसेच मुंब्र्यातील नागरिकांना तुम्ही आतंकवादी केलच आहेत, तर पोलिसांना पण माहित आहे. मुंब्र्यातील लोक कशी आहेत, असा इशारा देखील रेल्वे प्रशासन आणि पोलिसांना आव्हाड यांनी दिला आहे.