महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

ब्रिटनमधून आलेले २ जण कोरोना पॉझिटिव्ह - Britain corona news

२४ नोव्हेंबरपासून आतापर्यंत ७५ व्यक्ती ब्रिटनमधून मीरा भाईंदर शहरात आले आहेत. यामध्ये १५ व्यक्ती शहरातून बाहेर गेल्याची माहिती मिळाली आहे. तर ५ जणांचा शोध लागलेला नाही.

mira bhayander
mira bhayander

By

Published : Dec 26, 2020, 7:16 PM IST

मीरा भाईंदर - मीरा भाईंदर शहरात परदेशातून आलेल्या दोन व्यक्तींना कोरोनाचा लागण झाली आहे. त्यांना रामदेव पार्कमधील कोविड सेंटरमध्ये ठेवण्यात आले आहे. या दोन व्यक्तीचे नमुने पुन्हा घेऊन पुणे येथील प्रयोगशाळेत पाठवले आहेत.

50 जणांची चाचणी

२४ नोव्हेंबरपासून आतापर्यंत ७५ व्यक्ती ब्रिटनमधून मीरा भाईंदर शहरात आले आहेत. यामध्ये १५ व्यक्ती शहरातून बाहेर गेल्याची माहिती मिळाली आहे. तर ५ जणांचा शोध लागलेला नाही. यामध्ये दोन जण कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तर ५० जणांची कोविड चाचणी करण्यात आली आहे. त्याचे अहवाल प्रलंबित असल्याची माहिती आरोग्य विभागाचे अधिकारी प्रमोद पडवळ यांनी दिली आहे.

आरोग्य यंत्रणा सतर्क

ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा नवा प्रकार आढळून आल्यामुळे जगभरातील आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय, तसेच महाराष्ट्र शासनाकडून मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. मुंबईत या नव्या प्रकारच्या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी इग्लंडमधील विमानसेवा २१ डिसेंबरपासून बंद करण्यात आली आहे. विमानतळावरही विशेष खबरदारी घेतली जात आहे. परदेशातून आलेल्या प्रवाशांची आरोग्य तपासणीवर पालिकेने भर दिला आहे. त्यांना सात दिवस क्वारंटाईन ठेवण्यासाठी मुंबईतील विविध हॉटेल्समध्येही दोन हजार रुम राखीव ठेवल्या आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details