महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Minor Students Hired : वृक्ष लागवडीसाठी अल्पवयीन विध्यार्थाना तुटपुंज्या पगारावर जुंपले - वृक्ष लागवडीसाठी

वनविभागात सद्या वन जमिनीवर वृक्ष लागवडीचा उपक्रम (Tree planting activities) राबविण्यात येत आहे. दरवर्षी लाखो रुपयांचा निधी यासाठी खर्च केला जातो. परंतु याच सरकारी निधीचा व आदेशाचा खर्डी वनपरीक्षेत्राच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या शिरोळ, अजनूप केंद्रासह अनेक केंद्रात बालमजूराना खड्डे (Minor students were hired) खोदणेपासून ते झाडे लागवडी करण्यापर्यत तुंटपुज्या पगारावर राबवून घेतल्याचा ( for tree planting on meager salaries) प्रकार समोर येत आहे. या संबंधिचा एक व्हिडिओ ही समाजमाध्यमांत फीरत आहे.

Tree planting
वृक्ष लागवड

By

Published : Jul 12, 2022, 2:54 PM IST

ठाणे: पावसाळा सुरु होताच शहापूर तालुक्यात वनविभागात सद्या वृक्ष लागवडीचा उपक्रम वनविभागाकडून वन जमिनीवर राबविण्यात येत आहे. दरवर्षी लाखो रुपयांचा निधी वृक्षलागवड साठी केला जातो. परंतु याच सरकारी निधीचा व आदेशाचा खर्डी वनपरीक्षेत्राच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या शिरोळ अजनूप केंद्रासह अनेक केंद्रात सरकारी आदेशाची पायमल्ली करून बालमजूराना खड्डे खोदणेपासून ते झाडे लागवडी करण्यापर्यत तुंटपुज्या पगारावर राबवून घेतले जात असल्याचा व्हिडिओ समाज माध्यमात फीरत आहे.


शहापूर वनविभागाने शिरोळ आश्रम शाळेत शिकणाऱ्या व सुट्टीवर घरी आलेल्या लहानग्या विधार्थांना 7 रुपयात एक खड्डा अशी रोजंदारी ठरवून कामाला लावले. एक खड्डा व त्यात एक झाड लावून देण्याचे 7 रु.या शाळकरी मुलांना वनविभाग देत असल्याची माहिती झाडे लावणाऱ्या कामगार मुलांकडून मिळत आहे. 10 मोठी महीला पुरूष तर 8 ते 10 लहान अल्पवयीन विद्यार्थी या ठिकाणी राबवून घेतले जात आहेत. विशेष म्हणजे काम करणाऱ्या मजुरांना वेठीस धरून 3 दिवसात सुमारे 27,हजार खड्डे तयार करून त्यामध्ये झाडें लावलीत असा दावा वणविभाग करतेय पण प्रत्येक्षात मात्र तसे काहीही दिसून येत नाही. या बाबत शहापूर वन अधिकारांशी संर्पक साधला असता संपर्क होऊ शकला नाही. एकंदरीतच वृक्ष लागवडीत मोठा अनगोंदी कारभार् सुरु असल्याचे दिसून येत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details