महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

नवी मुंबईत अल्पवयीन मुलीवर बलात्कार, तर एका मुलावर अनैसर्गिक अत्याचार - Navi Mumbai Police News

मुलगी दिवाळीच्या सुट्टीत आजीच्या घरासमोर खेळत असताना किराणा दुकानदार सचिन लोंढे याने मुलीला दुकानात बोलावून तिच्यावर बलात्कार केला. मुलीने आरडा ओरड करू नये म्हणून तिला जीवे ठार मारण्याची धमकीही दिली

नवी मुंबईत अल्पवयीन मुलीवर बलात्कार

By

Published : Nov 18, 2019, 9:12 PM IST

ठाणे -शहरातील घरकाम करणाऱ्या महिलेच्या ११ वर्षीय मुलीवर किराणा दुकान मालकाने पाच ते सहा वेळा बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तसेच मुलीच्या चुलत भावावरदेखील दोन वेळा अनैसर्गिक पद्धतीने अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली.

शहरातील एक कॉलनीत पीडित मुलगी आई वडिलांसोबत ५ महिन्यापासून राहते. पीडित मुलीचे वडील रिक्षा चालक असून आई धुण्याभांड्याची काम करते. हे दांपत्य कामावर जाताना मुलीला जवळच राहणाऱ्या सासूकडे ठेवून जात असत. संध्याकाळी घरी परतत आले असता, अचानक मुलीच्या पोटामध्ये असह्य कळा येऊ लागल्या. यापूर्वीही अशा प्रकारे तिला वेदना होत होत्या. मात्र, डॉक्टरकडे नेल्यावर जुजबी औषधाने पीडितेची पोटदुखी थांबली होती. मात्र, यावेळी जास्तच त्रास होत असल्याने आईने मुलीला विश्वासात घेऊन व्यवस्थित विचारले असता, मुलगी दिवाळीच्या सुट्टीत आजीच्या घरासमोर खेळत असताना किराणा दुकानदार सचिन लोंढे याने मुलीला दुकानात बोलावून तिच्यावर बलात्कार केला. मुलीने आरडा ओरड करू नये म्हणून तिला जीवे ठार मारण्याची धमकीही दिली. असाच प्रकार त्याने पाच ते सहावेळा केला असल्याचेही पीडित मुलीने सांगितले. ही माहिती आईला सांगत असताना तिच्या चुलत भावाने सुद्धा किराणा दुकानदार सचिन लोंढे याने त्याच्याबरोबर सुद्धा असाच प्रकार केल्याचे सांगितले. हा प्रकार समजतात मुलीच्या आईने ताबडतोब रबाळे एम.आय.डी.सी पोलीस स्टेशन गाठून किराणा दुकान मालक सचिन लोंढे याच्या विरोधात तक्रार नोंदवली.

संबंधित आरोपी सचिन लोंढे याला पोक्सो कायद्या अंतर्गत रबाळे एमआयडीसी पोलिसांनी तत्काळ अटक केली आहे. त्याला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक नितीन गीते यांनी दिली आहे. यापूर्वी सचिन लोंढेबाबत महिलांकडे घाणेरड्या नजरेने पाहणे, लहान मुलींना घाणेरडा स्पर्श करणे अशा गैरवर्तणुकीबाबत अनेक तक्रारी राहिवाशांनीही सांगितल्या. वेळीच जर या नराधमाला आवर घातला असता तर आज माझ्या मुलांना लैंगिक अत्याचारापासून वाचवू शकलो असतो, असे पीडित मुलीच्या आईने सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details