महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Rape News : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; नराधमाला ठोकल्या बेड्या - Sexual abuse of a minor girl

शेजारी राहणाऱ्या बारा वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार ( Sexual abuse of a minor girl ) केल्याची धक्कादायक घटना कल्याणमध्ये समोर आली आहे. बाजारपेठ पोलीस ठाण्यात पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी नराधमाला बेड्या ठोकल्या ( accused arrested ) आहेत.

Sexual Abuse
Sexual Abuse

By

Published : Oct 17, 2022, 9:42 PM IST

ठाणे : शेजारी राहणाऱ्या बारा वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार ( Sexual abuse of a minor girl ) केल्याची धक्कादायक घटना कल्याणमध्ये समोर आली आहे. बाजारपेठ पोलीस ठाण्यात पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी नराधमाला बेड्या ठोकल्या ( accused arrested ) आहेत. संजय बनसोडे (वय 45 ) असे अटक नराधमाचे नाव आहे.

घरात केले लैंगिक अत्याचार - पीडित 12 वर्षीय मुलगी आपल्या कुटुंबासह कल्याण पश्चिमेकडे पालकांच्या समवेत राहते. ही मुलगी आपल्या घराच्या परिसरात काल दुपारी खेळत असताना नराधम संजय बनसोडे याने तिला बहाण्याने घरात बोलावले. त्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार करून कुठं वाचता केल्याचं मारण्याची धमकी दिली.

नराधमाला पोलीस कोठडी - संध्याकाळी पीडित मुलीच्या पोटात दुखू लागल्याने घरच्यांनी तिच्याकडे चौकशी केली असता, तीने आपल्या पालकांना घडलेला प्रकार सांगितला. हा प्रकार ऐकुन पीडित मुलीच्या कुटुंबाने थेट बाजारपेठ पोलीस ठाणे गाठत याबाबत तक्रार नोंदवली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करत नराधम संजय बनसोडे याला बेड्या ठोकल्या आहेत. आरोपी संजय बनसोडे याला सोमवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला 20 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details