ठाणे - एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीचे बनावट आधारकार्ड ते शाळा सोडल्याच्या दाखल्यापर्यंतचा १८ वर्षे वयाचा ( fake Aadhaar card ) पुरावा तयार करण्यात आला. तिचा विवाह गुजरातमधील २५ वर्षीय तरुणासोबत केल्याचा प्रकार उल्हासनगरमध्ये समोर आला आहे. याप्रकरणी पीडित मुलीने हिललाईन पोलीस ( Hilline Police ) ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी तिची आई व मामावर विविध कलमानुसार ( Minor Marriage girl case ) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडित मुलीचे शिक्षिका होण्याचे (victims dream of becoming a teacher )स्वप्न-पीडित मुलगी तिच्या आई व मामासह नेवाळी नाका भागात राहते. तिच्या आईला पूजा नावाच्या महिलेने पीडित मुलीसाठी गुजरातमध्ये विवाहासाठी मुलगा असल्याचे सांगितले. तेव्हापासून पूजा नावाच्या महिलेने मामाच्या मदतीने पीडित मुलीचे आधारकार्ड ते शाळा सोडल्याच्या दाखल्यापर्यंतचा १८ वर्ष वयाचा पुरावा बनवला. तिचा विवाह गुजरातमधील तरुणाशी निश्चित केला. परंतु पीडित मुलीला पुढे शिकून शिक्षिका व्हायचे होते. मात्र तिच्या आईने ७ वी इयत्तेपर्यतच कुटुंबाची परिस्थिती बिकट असल्यामुळे तिची शाळा बळजबरीने बंद केली. त्यातच विवाहसाठी पीडित मुलगी तयार नव्हती. तरी बळजबरीने मुलीची आई व मामाने पीडित मुलीला गुजरातमध्ये नेऊन तिचा २५ जून २०२२ रोजी जयेश नाथानी ( Accused Jayesh Nathani )नावाच्या २५ वर्षीय तरुणाशी विवाह केला.
मुलीच्या वडिलांना गुजरातमध्ये लग्नाला विरोध-तपास अधिकारी महिला पोलीस उपनिरीक्षक अंबिका घस्ते यांनी सांगितले कि, आई आणि मामाने पीडितेला लग्नासाठी जबरदस्ती केली होती. त्यांनी तिची सर्व कागदपत्रे बदलून २५ जून रोजी गुजरातमध्ये लग्न होईपर्यंत त्यांनी तिला कधीही घराबाहेर बाहेर जाऊ दिले नाही. मात्र मुलीच्या वडिलांनी गुजरातमधील लग्नाला विरोध केला. म्हणून मुलीच्या आईने तिच्या वडिलांना लग्नात सामील होऊ दिले नाही.
सासरहून असा काढला पीडितेने पळ-दुसरीकडे मुलगी पळून जाण्याचा प्रयत्न करत होती. पण तिला विवाह झाल्यानंतरही संधी मिळत नाही. मात्र ५ जुलै रोजी ती पुजेशी संबंधित काही कामासाठी सासरच्या नातेवाईकांसोबत घराबाहेर पडली. त्यावेळी तिच्याकडे घरी परतण्याचे तिकीटाचे काही पैसे होते. ही संधी साधून तिने तेथून पळ काढला. ती उल्हासनगरला पोहोचली. पण तिला माहित होते की ती घरी परतली तर तिला तिच्या आईचे ऐकावे लागेल. तिला पुन्हा सासरी पाठवतील या भीतीने तिने हिल लाईन पोलीस ठाणे गाठले.