ठाणे - शेजार धर्माला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. शेजारी राहणाऱ्या एका साडेचार वर्षाच्या मुलीवर नऊ वर्षाच्या अल्पवयीन मुलाने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली ( minor girl abuse by minor boy ) आहे. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात ( Vitthalwadi Police Station ) अत्याचारासह पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
minor girl abuse by minor boy : नऊ वर्षीय अल्पवयीन मुलाचा साडेचार वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार - Vitthalwadi Police Station
शेजार धर्माला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. शेजारी राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर अल्पवयीन मुलाने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना ( minor girl abuse by minor boy ) घडली आहे. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात ( Vitthalwadi Police Station ) अत्याचारासह पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
खेळण्याच्या बहाण्याने नेऊन लैंगिक अत्याचार -पीडित अल्पवयीन मुलगी कल्याण पूर्वेतील विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत कुटूंबासह राहते. तिच्याच शेजारी नऊ वर्षाचा अल्पवयीन मुलगा राहत असून त्याने 3 एप्रिल रोजी दुपारच्या सुमारास खेळण्याच्या बहाण्याने पीडित मुलीला घराच्या मागच्या बाजूला नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर काही दिवसांनी पीडित मुलीला लैंगिक अत्याचारामुळे त्रास झाल्याने तिच्याकडे आईने चौकशी केली असता हा धक्कादायक प्रकार समोर आला. त्यानंतर 15 एप्रिलला पीडितेच्या आईने विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात धाव घेऊन शेजारी राहणाऱ्या नऊ अल्पवयीन मुलाविरोधात भा.दं.वि.चे कलम 376 सह पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याचा अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक चौधरी करीत आहेत.
हेही वाचा -MAN KILLS WIFE : जेवणात जास्त मीठ टाकल्याने संतापलेल्या पतीने केली पत्नीची हत्या