ठाणे- शिवसेनेचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री सुधीर जोशी यांच्या निधनामुळे कल्याण डोंबिवलीतील विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याहस्ते साधेपणाने ( Smart city development work inauguration in Kalyan ) करण्यात आले. यावेळी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणात केंद्राचा उल्लेख न केल्याने केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी ( Minister Kapil Patil with Eknath Shinde ) पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या समोरच नाराजी व्यक्त केली. यावेळी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्री पाटील यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला.
स्मार्ट सिटी अंतर्गत खाडी किनारा विकसितकरणाचे भूमिपूजन
कल्याण शहरात होणारी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी एमएमआरडीएच्या माध्यमातून ( MMRDA work at Durgadi fort ) दुर्गाडी किल्ल्याजवळ उल्हास खाडीवर सहा पदरी पूल बांधण्यात आला आहे. यातील दोन मार्गिकांचे याआधी लोकार्पण करण्यात आले होते. तर उर्वरित चार मार्गिकांचे आज लोकार्पण ( four highways work at Bhivandi ) करण्यात आले. या पुलामुळे भिवंडी कल्याण रस्त्यावरील वाहतूक कोंडी व प्रदूषण कमी होण्यास मदत होणार असल्याचे सांगण्यात आले. तर कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्र हे उल्हास नदी किनाऱ्यावर वसलेले आहे.
स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत अनेक सुविधा उपलब्ध-
कल्याण डोंबिवली शहराला लाभलेला ऐतिहासिक वारसा सांगणारा प्राचीन दुर्गाडी किल्ला हे या शहराचे प्रतिक आहे. दुर्गाडी किल्ल्यालगतच्या किनाऱ्यावर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याच्या आरमाराची नौका बांधणीची मुहूर्तमेढ रोवली होती. या किनाऱ्याचे ऐतिहासिक महत्त्व जपण्याच्या दृष्टिकोनातून महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या संकल्पनेतून स्मार्ट सिटी अभियानांतर्गत नदी किनारा व नेव्हल गॅलरी विकसित करण्याचा प्रकल्प स्मार्ट कल्याण-डोंबिवली डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड मार्फत हाती घेण्यात आला आहे. समुद्र किनाऱ्याचे रक्षण करणाऱ्या बलाढ्य भारतीय नौसेनेचा अति विशाल माहितीपट तसेच 2.5 कि.मी किनारा सुशोभीकरण, दुर्गाडी किल्ल्या लगत बगीचा विकसित करणे, पायवाट व सायकल ट्रॅक बनविणे उपलब्ध होणार आहे. तसेच लहान मुलांसाठी प्ले एरिया, व्याख्यान एरिया तयार करणे इत्यादी सुविधांमुळे कल्याण शहराचा नदीकिनारा विकसित होऊन नागरिकांना मॉर्निंग तसेच इव्हिनिंग वॉककरिता पर्याय उपलब्ध होणार आहे.