ठाणे -म्हाडा परीक्षेमध्ये पारदर्शकता राहावी, यासाठी संबंधित कंपनीच कंत्राट रद्द करुन, रद्द केलेली परीक्षा टीसीएस ( Mhada Exam will Be Taken by TCS ) या संस्थेमार्फत घेणार असल्याची माहिती गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड ( Housing Minister Jitendra Awhad ) यांनी दिली आहे. परीक्षेत पारदर्शकता आणि प्रामाणिक, हुशार, गरीब घरांतून आलेल्या मुलांचे हक्क डावलले जाऊ नये, हाच उद्देश आहे. त्यामुळे टीसीएस सारख्या विश्वविख्यात आणि इतिहासात कधीच चुका केल्या नसलेल्या संस्थेमार्फत आम्ही येणारी परीक्षा घेणार असल्याचे मंत्री आव्हाड यांनी सांगितले आहे.
MHADA Exam : पारदर्शकतेसाठी म्हाडाच्या परीक्षा आता टीसीएस घेणार - जितेंद्र आव्हाड - टीसीएस घेणार आता म्हाडाची परीक्षा
रद्द केलेली परीक्षा टीसीएस ( Mhada Exam will Be Taken by TCS ) या संस्थेमार्फत घेणार असल्याची माहिती गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड ( Housing Minister Jitendra Awhad ) यांनी दिली आहे. परीक्षेत पारदर्शकता आणि प्रामाणिक, हुशार, गरीब घरांतून आलेल्या मुलांचे हक्क डावलले जाऊ नये, हाच उद्देश आहे.
गुन्हेगार प्रवृत्तीचे जे विद्यार्थी असतील जे कोणाला हाताशी धरुन जर जागा हिसकावून घेत असतील ते थांबवणे आमचे कर्तव्य आहे. याच माध्यमातून ज्यांनी ज्यांनी आपल्याला नोकरी मिळेल या इच्छेपोटी पैसे दिलेत, त्यांना आम्ही गुन्हेगार ठरवणार नाही. त्यात विद्यार्थ्यांची काहीही चुक नाही. पण तुम्ही जर दलालांना पैसे दिले असतील, तर त्या दलालांची नाव आम्हाला कळवा त्यांना धडा शिकविण्याची जवाबदारी आम्ही घेतो, असही आव्हाड म्हणाले आहेत. तर गेली पाच सात वर्षे ज्या एजन्सीज यासाठी किंवा सरकारी नोकर भरती परिक्षेसंदर्भात काम करत आहेत. त्यांच्याकडून सर्व कामे काढून टीसीएस किंवा आयबीपीएस सारख्या संस्थेला हे काम देण्यात यावे, अशी मागणी देखील मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचे आव्हाड यांनी सांगितले आहे.