महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

सैन्यदलातील सैन्यात भरतीचा कंत्राटदार कोण..? - मंत्री जितेंद्र आव्हाड - अग्निपथ

अग्निपथ योजनेत अग्नीवीर या नावाखाली सैनिकांची भरती केली जाणार आहे. पण, त्यांना सैनिक म्हणू शकत नाही. त्यांना आपण कंत्राटी कर्मचारी असेच म्हणू. पण, त्यांचा कंत्राटी कर्मचाऱ्यांचा कंत्राटदार कोण असेल?, असा सवाल गृहनिर्माण मंत्री डाॅ. जितेंद्र आव्हाड ( Minister Jitendra Awhad ) यांनी पत्रकारांशी बोलताना मोदी सरकारला विचारला.

मंत्री जितेंद्र आव्हाड
मंत्री जितेंद्र आव्हाड

By

Published : Jun 20, 2022, 7:04 AM IST

ठाणे - सैन्य दलात अग्नीवीर या नावाखाली सैनिकांची भरती केली जाणार आहे. पण, त्यांना सैनिक म्हणू शकत नाही. त्यांना आपण कंत्राटी कर्मचारी असेच म्हणू. पण, त्यांचा कंत्राटी कर्मचाऱ्यांचा कंत्राटदार कोण असेल?, असा सवाल गृहनिर्माण मंत्री डाॅ. जितेंद्र आव्हाड ( Minister Jitendra Awhad ) यांनी पत्रकारांशी बोलताना मोदी सरकारला विचारला.

बोलताना मंत्री जितेंद्र आव्हाड

डाॅ. जितेंद्र आव्हाड म्हणाले की, भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस कैलास विजयवर्गीय यांनी भाजपची मानसिकता बोलून दाखविली. ते म्हणाले,"जर मला भाजपने सर्व कार्यालयांचा सिक्युरिटी इंचार्ज केला. तर चार वर्षांनंतर जे अग्नीवीर बाहेर पडतील. त्यांना भाजपच्या कार्यालयावर सुरक्षा रक्षक म्हणून नोकरी देऊ शकेन." म्हणजे काय तर 'वाॅचमॅन' म्हणजे या तरुणांचे नेमके काय करायचे ठरवले आहे. दुसरीकडे किशन रेड्डी नावाचे केंद्रीय मंत्री म्हणतात, "या चार वर्षात त्यांना नाभिकाचे, धोब्याचे, ड्रायव्हरचे, इलेक्ट्रिशियनचे ट्रेनिंग मिळेल". म्हणजे सैन्यात या तरूणांना नाभिक, धोबी, ड्रायव्हर, इलेक्ट्रिशियन बनविण्यासाठी नेणार आहात काय?, हे सर्व सहा महिन्यांचे कोर्स आहेत. भाजपच्या नेत्यांना आणि केंद्रीय मंत्र्यांना अग्निपथ आणि अग्निवीर याबद्दल काहीही माहिती नाही. हा प्रकार म्हणजे देशातील तरूणांच्या भविष्याशी खेळण्याचा प्रयत्न आहे. भारतीय सेना कंत्राटावर चालू शकत नाही. या भूमीवर ज्याचे मनापासून प्रेम आहे, परीक्षेच्या आधी जो तीन चार वर्षे मेहनत करतो, तो अभ्यास करताना स्वप्न बघतो की आपणाला भारतीय सैन्यात जायचे आहे. त्याच्या स्वप्नांचा चुराडा होताना दिसत आहे.

देशसेवा करणाऱ्यांचा अपमान - अग्नीवीर हा प्रकार बहुजनांच्या आयुष्याशी खेळ आहे. सैन्यात बहुजनांचीच मुले जातात ना आपल्या गावातील सैनिक जेव्हा शहीद होतो तेव्हा पूर्ण गाव रडते. कारण तो आपल्यासाठी गोळ्या झेलतो. अशा या देशसेवा करणाऱ्या एका वर्गाचा हा सर्वात मोठा अपमान आहे.

देशाच्या सुरक्षेशी द्रोह - अमित शाह यांनी अग्नीवीरांना दहा टक्के आरक्षण दिले जाईल, असे म्हटले आहे. याबाबत विचारले असता डाॅ. जितेंद्र आव्हाड म्हणाले, कंत्राटी पद्धतीने सैन्यभरती करणे हे देशाच्या सुरक्षेशी द्रोह करणे आहे. ज्या तरुणाला अत्याधुनिक शस्रे चालविता येतात. त्याला जर उद्या नोकरी नाही मिळाली तर तो काय करेल? देशसेवेसाठी सैन्यात भरती होण्यासाठी तरुण जेव्हा तीन वर्षे मेहनत करतात. पण, अग्नीवीरच्या निमित्ताने तरुणांची टिंगल टवाळी चालू आहे. नोकऱ्या देऊ शकत नसाल तर देऊ नका, पण, सैन्यदलाची आणि तारुण्यांची चेष्टा करू नका, असेही मंत्री आव्हाड म्हणाले. यावेळी मोदी सरकारच्या आठ वर्षे पूर्ण झाल्याबाबत विचारले असता त्यांनी बोलण्यास टाळले.

हेही वाचा -Divya Pavle Success : कर्करोगाशी झुंज देत दहावीच्या परीक्षेत दिव्या पवळेचे यश, जिद्दीवर मिळवले 81 टक्के

ABOUT THE AUTHOR

...view details