ठाणे -गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी स्वतःला क्वारंटाईन करुण घेतले आहे. त्यांचा चालक आणि सुरक्षा रक्षकचा रिपोर्ट कोरोना पॉजेटिव्ह आला आहे. त्यामुळे आव्हाड यांनी स्वतःला होम क्वारंटाइन केले आहे.
मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी स्वतः ला केले क्वारंटाइन
मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या सुरक्षा रक्षक आणि चालकाचा रिपोर्ट कोरोना पॉजेटिव्ह आला आहे. त्यामुळे जेतेंद्र आव्हाड यानी स्वत:ला क्वारेनटाईन केले.
कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यामुळे कोरोनाची लागण आता क्मयुनिटी स्प्रेड म्हणजे एकाच ठिकाणी मोठ्या प्रमाणात अनेक लोकांना होवू लागली आहे. ही ठाण्याकरता धोक्याची घंटा आहे. ठाण्यात मुंब्रा येथे तबलिगी समाजाच्या लोकांना ताब्यात घेवून त्यांना मुंब्रातील काळसेकर रुग्णालयात नेण्यात आले होते. त्या ठिकाणी अनेकांना कोरोनाचा प्रादुर्भाव झाला आहे. त्याचा परिणाम म्हणून त्यावेळेस त्या ठिकाणी असलेले पोलीस, पत्रकार आणि राजकीय मंडळी यांना कोरोनाची लागन झाली आहे. ठाण्यात गेल्या ४८ तासात २ पत्रकार, ५ ते ६ राजकीय नेते आणि कार्यकर्ते यांच्यासह इतरांना पकडले आहे. ठाण्यात आत्तापर्यंत कोरोनाबाधितांची संख्या १० पेक्षा जास्त झाल्याची माहिती वरीष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.