ठाणे - 'राज्याचे गृहनिर्माणमंत्रीजितेंद्र आव्हाड यांना कोरोना झालेला नाही. त्यांची कोणतीही चाचणी कोरोना पाॅझिटिव्ह आलेली नाही. जितेंद्र आव्हाड हे योग्य ती काळजी घेत आहेत आणि सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचे पालन करत आहेत. त्यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेऊ नये' असा खुलासा माजी खासदार आणि ठाणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आनंद परांजपे यांनी केला आहे.
मंत्री जितेंद्र आव्हाड यांना कोरोना विषाणूची लागण नाही.. माजी खासदार आनंद परांजपे यांची माहिती हेही वाचा...'ती' बातमी साफ खोटी, कोरोनामुळे राज्याचे जिल्हानिहाय 'झोन' केलेले नाहीत - विश्वजीत कदम
'मंत्री जितेंद्र आव्हाड यांना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना करोनाची लागण झाली. अशी बातमी व्हायरल होताच आपण त्या सर्व गोष्टीची शहानिशा केली आहे. जितेंद्र आव्हाड यांना कोरोना झालेला नाही. त्यांच्या सर्व टेस्ट निगेटिव्ह आलेल्या आहेत. आवश्यक ती सर्व काळजी घेत जितेंद्र आव्हाड जनतेची सेवा करत आहेत. मात्र, त्यांच्या काही सहकाऱ्यांना कोरोनाची लागण झाली असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.' असा खुलासा राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार आनंद परांजपे यांनी केला आहे.
दरम्यान मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यासोबत असणाऱ्या त्यांच्या १६ सहकाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. तसे रिपोर्ट देखील आले आहेत. त्यामुळेच जितेंद्र आव्हाड यांच्याबाबत कोरोनाच्या अफवा निर्माण होत आहेत.