महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

डोंबिवली सामूहिक बलात्कार प्रकरण; कठोर कारवाई करण्याचे पालकमंत्र्यांचे पोलीस आयुक्तांना आदेश - कल्याण जिल्हा सत्र न्यायालय

२३ आरोपींना गुरुवारी कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले. न्यायालयाने आरोपींना २९ सप्टेंबरपर्यत पोलीस कोठडी सुनावली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या प्रकरणातील १० ते १२ आरोपी विविध राजकीय पक्षांशी संबधित असल्याचे समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

एकनाथ शिंदे
एकनाथ शिंदे

By

Published : Sep 23, 2021, 9:43 PM IST

ठाणे -डोंबिवलीतील बलात्काराची घटना अतिशय निंदनीय असून माणुसकीला काळीमा फासणारी आहे. या घटनेची गंभीर दखल घेऊन ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे पोलीस आयुक्तांना आरोपीवर कोठार कारवाईचे आदेश दिले आहेत.

डोंबिवलीतील सामूहिक बलात्काराची घटनेत २३ आरोपींना अटक झाली आहे. याप्रकरणी दोषी आरोपींना अटक करण्याच्या सूचना पालक मंत्री एकनाथ शिंदे यांनी पोलिस आयुक्तांना दिल्या आहेत. अशा प्रकारच्या घृणास्पद घटना घडू नये, यासाठी दोषींवर कठोरात कठोर कारवाई होईल. असे पालकमंत्री शिंदे यांनी सांगितले. याप्रकरणी छोट्या घटना घडल्या तरीही पोलिसांनी तात्काळ कारवाई करण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी पोलीस आयुक्तांना दिले आहेत.

कठोर कारवाई करण्याचे पालकमंत्र्यांचे पोलीस आयुक्तांना आदेश

हेही वाचा-अजब उपचार! मानसिक आजारावर डॉक्टरांनी विस्की, बिअरसह लैगिंक संबंध ठेवण्याचा दिला सल्ला

२३ आरोपींना गुरुवारी कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले. न्यायालयाने आरोपींना २९ सप्टेंबरपर्यत पोलीस कोठडी सुनावली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या प्रकरणातील १० ते १२ आरोपी विविध राजकीय पक्षांशी संबधित असल्याचे समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

संबंधित बातमी वाचा-धक्कादायक! अल्पवयीन पीडितेवर 33 नराधमांचा बलात्कार, व्हिडिओ क्लिप दाखवून केले कृत्य

सलग नऊ महिने केले अत्याचार

15 वर्षीय पीडित मुलगी मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहते. २२ जानेवारी २०२१ तिच्या प्रियकराने तिच्यावर अत्याचार केला. त्यावेळी त्याने अत्याचार करताना मोबाईलमध्ये चित्रीकरण केले होते. तेव्हापासूनच तिला व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. डोंबिवली, बदलापूर, मुरबाड व रबाळे या परिसरात आरोपींनी २२ सप्टेंबर २०२१ पर्यंत म्हणजे ९ महिन्यापर्यत तिच्यावर वारंवार अत्याचार केला. या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात बुधवारी रात्रीच्या सुमारास भादवि ३७६, ३७६ (एन), ३७६ (३) ३७६ (ड) (अ) सह पोक्सो कायदा कलम ४, ६१० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

2 बालकांचाही समावेश

कल्याण पोलीस परीमंडळ ३ मधील इतर पोलीस ठाणे तसेच मानपाडा पोलीस ठाण्यातील ४ पोलीस पथकांनी आरोपीचे नाव व राहण्याचे ठिकाण शोधून काढले. २३ जणांपैकी २ बालकांचाही या गुन्हयात सहभाग असल्याचे आढळून आला आहे. या गुन्ह्यातील उर्वरीत १० आरोपी फरार असून त्यांचा शोध पोलीस घेत आहेत. आरोपींना अटक करण्याचे प्रयत्न करत असल्याचे अपर पोलीस आयुक्त दत्तात्रय कराळे यांनी सांगितले आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास सहायक पोलीस आयुक्त, प्रशासन आणि सोनाली ढोले करत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details