ठाणे - राज्यात कोरोनाच्या वाढत्या रुग्णांची ( coronaviruses is increasing ) नोंद होत असताना चौथ्या लाटेचा सौम्य फटका ठाण्यातील ५० टक्के ( corona in Thane citizens ) नागरिकांना बसला असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. नागरिकांनी दुसरा डोस घेऊनही काही जणांना सौम्य लक्षणे ( Mild symptoms of corona ) दिसून आली. नागरिकांनी घरीच उपचार घेऊन दोन दिवसांत बरे झाल्याचा दावा केला आहे. या वृत्ताला पालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी देखील दुजोरा दिला आहे. गेल्या ३ आठवड्यापासून अनेकांना सर्दी, ताप, खोकला अशी लक्षणे दिसून आली होती. मात्र, कोविड चाचणी न करता अनेकांनी घरीच राहून उपचार घेतले आहेत.
सर्वाधिक फटका महाराष्ट्राला बसला -भारतात कोरोनाच्या पहिल्या तीन लाटांचा सर्वाधिक फटका महाराष्ट्राला बसला आहे. यामध्ये राज्यात रुग्णसंख्येचे उच्चांक नोंदवले गेले आहेत. त्यातच प्रत्येक लाटेत नव्या व्हेरियटने डोके ( Corona infection ) वर काढल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. राज्यात कोरोना नियंत्रणात असली तरी, वाढत्या कोरोना रुग्णांमुळे कोणताही धोका नसल्याचे आरोग्य विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. ठाणे जिल्ह्यासहशहारत वाढत्या रुग्णाची संख्या लक्षात घेता लसीकरणावर भर दिला जात आहे. 'मिशन हर घर दस्तक' मोहिमेअंतर्गत लसीकरण केले जात असल्याची माहिती पालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी दिली.
लसीकरणावर भर - वाढत्या रुग्णसंख्येसोबतच जिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे जिल्हा आरोग्य विभाग सतर्क ( District Health Department alert ) झाला आहे. लागण झालेल्या कर्मचाऱ्यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर घरीच उपचार सुरू आहेत. कोरोनाच्या चौथ्या लाटेचा फटका अनेकांना बसला असला तरी, कोणाला त्रास झालेला नाही. ठाणे शहारत दररोज हजाराहून अधिक कोविड चाचण्या ( Covid tests ) करण्यात येत आहे. यामध्ये अनेक जणांना कोरोनाची लागन झाल्याचे आढळून आले आहे.
घरोघरी जाऊन लसीकरण -ठाणे महापालिकेच्या माध्यमातून शहारत घरोघरी जाऊन लसीकरण करण्यास सुरुवात झाली आहे. ज्या नागरीकांनी दुसरा डोस घेतला नाही त्यांचे लसीकरण केले जात असल्याची माहिती पालिका आयुक्त डॉ. शर्मा यांनी दिली. कोविड बाबत सावधानी बाळगणे आवश्यक असून नागरिकांनी काळजी घ्यावी असे पालिकेकडून करण्यात आले आहे.
पालिकेची यंत्रणा सज्ज -वाढत्या रुग्णसंखेमुळे पालिका प्रशासनाची यंत्रणा सज्ज झाली आहे. महापालिकेचे जम्बो कोविड सेंटर असलेले पार्किंग प्लाझा रुग्णालयात १ हजार १०० बेड उपलब्ध आहेत. त्याचबरोबर व्हॉटस रुग्णालय देखील सज्ज ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सद्या बेड उपलब्ध असून ऑक्सिजनचा साठा पुरेसा असल्याचे आयुक्तांनी सांगितले.