महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

'प्लास्टिक द्या अन् डस्टबिन घेऊन जा' - पालिकेचा सामाजिक संस्थांसोबतचा उपक्रम - प्लॅस्टीक बॉटल क्रशर मशिन्स

ठाणे महानगरपालिकेद्वारे शहरातील 5 विविध सार्वजनिक ठिकाणांवर प्लॅस्टीक बॉटल क्रशर मशिन्स उभारण्यात येत आहेत. या मशिनमध्ये नागरिकांनी प्लॅस्टीकची रिकामी बाटली टाकल्यानंतर बाटलीचा चुरा होणार आहे.

प्लॅस्टिक बंदीसाठी उपाययोजना

By

Published : Sep 20, 2019, 11:08 AM IST

ठाणे- शहरात वाढत असलेल्या प्लॅस्टिकच्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी पालिका प्रशासनाने मागील काही महिन्यांपासून सामाजिक संस्थाची मदत घेऊन अभिनव उपक्रम सुरू केले आहेत. महानगरपालिका क्षेत्रात प्लॅस्टीक कचऱयाच्या शास्त्रोक्त विल्हेवाटीकरिता ठाणे महानगरपालिकेद्वारे विविध प्रकल्प कार्यान्वीत करण्यात आले आहेत.

'प्लास्टिक द्या अन् डस्टबिन घेऊन जा'

ठाणे महानगरपालिकेद्वारे शहरातील 5 विविध सार्वजनिक ठिकाणांवर प्लॅस्टीक बॉटल क्रशर मशिन्स उभारण्यात येत आहेत. या मशिनमध्ये नागरिकांनी प्लॅस्टीकची रिकामी बाटली टाकल्यानंतर बाटलीचा चुरा होणार आहे. सदर प्लॅस्टीकचा चुरा स्त्री मुक्ती संघटना या कचरावेचक महिलांच्या संस्थेद्वारे संकलन केले जाणार आहे. त्यानंतर हा चुरा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाद्वारे मान्यताप्राप्त प्लॅस्टीक रिसायक्लर आस्थापनेकडे पुनर्चक्रीकरणाकरिता जमा करण्यात येणार आहे. तसेच मशिनमध्ये प्लॅस्टीक बॉटल टाकणाऱया नागरिकाला प्रोत्साहनपर सवलतीचे कुपन या मशिनमधून प्राप्त होईल.

ठाणे शहरातील ठाणे स्टेशन परिसर, तलावपाळी, आनंद सिनेमासमोर, घंटाळी व बी-केबीन या सार्वजनिक ठिकाणांवर मे. कन्सेप्ट बिझनेस प्रॉडक्ट्स प्रा. लि. या कंपनीच्या माध्यमातून या मशिन्स उभारण्यात येत आहेत. याशिवाय कोपरी येथील कचरा रिसायकल केंद्रात प्लॅस्टिक द्या आणि रिसायकल झालेला प्लॅस्टिकचा डस्टबिन घेऊन जा, असा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी आपल्या घरातील खराब प्लॅस्टिक या केंद्राला देऊन प्रदूषणमुक्त करण्यासाठी प्रयत्न करावा, असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते विजयकुमार कट्टी यांनी केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details