ठाणे - भिवंडीत आगीचे सत्र सुरूच असून आज पहाटेच्या सुमारास शहरातील काजी कंपाऊंड परिसरामध्ये असलेल्या एका यंत्रमाग कारखान्याला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. (Fire cloth factory At Bhiwandi ) भिवंडीतील काजी कंपाऊंडमध्ये हा (Fire cloth factory At Bhiwandi ) यंत्रमाग कारखाना असून या कारखान्यात कपड्यांचा मोठ्या प्रमाणात साठा साठवून ठेवण्यात आला आहे. तर, कारखान्याच्या आजूबाजूला सुमारे ४० ते ५० रहिवाशी घरे आहेत.
परिसरातील वीजपुरवठा खंडित
आग लागतच रहिवासी परिसरात एकच खळबळ उडाली होती. ही आग एवढी भीषण आहे की कारखानाच्या छताचे पत्रे तुटून हवेत उडत होते. त्यामुळे आजूबाजू राहणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, खबदारीचा उपाय म्हणून परिसरातील वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. शिवाय पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेतली होती.