महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Fire News : मुंब्रा परिसरातील पुठ्ठ्याच्या गोदामाला भीषण आग - Firefighters 4 Vehicles Incident

शहरातील मुंब्रा परिसरात एका गोदामाला भीषण ( godown fire ) आग लागली. अग्निशमन दलाच्या ४ गाड्या, मुंब्रा पोलीस पथक घटनास्थळी ( Firefighters 4 Vehicles Incident ) दाखल झाले आहे. गोदामाला अचानक आगल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Fire News
fire

By

Published : Oct 16, 2022, 8:30 PM IST

Updated : Oct 16, 2022, 10:50 PM IST

ठाणे -शहरातील मुंब्रा परिसरात एका पुठ्ठ्याच्या गोडाऊनला भीषण ( godown fire ) आग लागली. अग्निशमन दलाच्या ४ गाड्या, मुंब्रा पोलीस पथक घटनास्थळी ( Firefighters 4 Vehicles Incident ) दाखल झाले आहे. गोदामाला अचानक आगल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

मुंब्रा परिसरातील गोदामाला भीषण आग

आग विझवण्याचे प्रयत्न सुरू -रात्री 2 च्या सुमारास ही आग लागल्याची माहीती मिळते आहे. अग्निशशमन दलाच्या घटनास्थळी दाखल झाली असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहे. लाखोंंचे नुकसान झाल्याची माहिती समोर येत आहे. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आग विझवण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. या आगीत कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही. तरी, आगीमध्ये गोडाऊनमधील पुठ्ठे जळून खाक झाले आहेत.

अवैध गोडाऊनसाठी आहे बदनाम -हा परिसर अवैध गोडाऊन साठी प्रसिद्ध असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भंगाराचा व्यवसाय चालतो. येथील सर्व गोडाऊन हे अवैध असून महानगरपालिकेच्या प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे येथे हा गोडाऊनचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरू आहे. या ठिकाणी वारंवार आगीच्या घटना घडत असून स्थानिकांनी यावर त्वरित उपाययोजना करण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे.

Last Updated : Oct 16, 2022, 10:50 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details