ठाणे -गेल्या काही दिवसांपासून ठाणे जिल्ह्यातील कंपन्यांना आगी लागण्याचा प्रकार मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. आज अंबरनाथ एमआयडीसीत आर के 1 नावाच्या बिस्कीट कंपनीला भीषण आग लागली. दोन दिवसांपूर्वीच आसनगाव येथील प्लॅस्टिक कंपनीला लागली होती
एमआयडीसी भागात असलेल्या आर के 1 नावाच्या बिस्कीट कंपनीला भीषण आग सकाळी सव्वा सहाच्या सुमारास कंपनीला आग लागल्याची माहिती आहे. सुदैवाने आतापर्यत या आगीमुळे कोणालाही दुखापत झाली नसल्याचे सांगण्यात आले.
या भीषण आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अंबरनाथ पालिकेचे २, अंबरनाथ एमआयडीसीचे २, उल्हासनगर १, कल्याण डोंबिवली १ असे ६ फायरब्रिगेड घटनास्थळी दाखल असून आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करीत आहेत. तर दुसरीकडे गेल्या काही दिवसांपासून ठाणे जिल्ह्यातील कंपन्यांना आगी लागण्याचा प्रकार मोठ्या प्रमाणावर वाढला आहे.
हेही वाचा -पाकिस्तानातून भारतात परतलेल्या गीताला अखेर कुटुंब परत मिळाले