महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Breach of Curfew in Bhiwandi : भिवंडीत जमावबंदीसह संचारबंदीचे तीन तेरा - Corona rules fuss in Thane

भिवंडीत जमावबंदीसह संचारबंदीचे तीन तेरा वाजल्याचे चित्र ( Breach of Curfew in Bhiwandi ) पाहवयास मिळत असून पालिकेसह पोलीस प्रसाशनाची हाताची घडी तोंडावर बोट हेच कोरोनाचा फैलाव ( Corona rules fuss in Thane ) करण्यात कारणीभूत ठरत असल्याची चर्चा भिवंडीकरांमध्ये रंगली आहे.

Breach of Curfew in Bhiwandi
भिवंडीत जमावबंदीचे उल्लंघन

By

Published : Jan 13, 2022, 4:25 PM IST

ठाणे - भिवंडीतील विविध रस्त्यात अडथळा करणाऱ्या हातगाड्यांवर पालिका प्रशासनाने त्या हाटगाड्यावर जेसीबी फिरवत कारवाई केली खरी, मात्र त्यानंतर जमावबंदीत शेकडो फेरीवाल्यांनी पालिका मुख्यालयात एकच गोंधळ घातला होता. तर काही दिवसांपूर्वी कबड्डीचे सामने 'महापौर चषक' नावाने आयोजित करण्यात आले होते. हे सामने पाहण्यासाठीही हजारो नागरिक संचारबंदी असताना उपस्थित होते. मात्र त्यावर पोलीस व पालिका प्रशासनाने कारवाई केली नसल्याचे दिसून आले. त्यामुळे भिवंडीत जमावबंदीसह संचारबंदीचे तीन तेरा वाजल्याचे चित्र ( Breach of Curfew in Bhiwandi ) पाहवयास मिळत असून पालिकेसह पोलीस प्रसाशनाची हाताची घडी तोंडावर बोट हेच कोरोनाचा फैलाव ( Corona rules fuss in Thane ) करण्यात कारणीभूत ठरत असल्याची चर्चा भिवंडीकरांमध्ये रंगली आहे.

भिवंडीत जमावबंदीचे उल्लंघन

जमावबंदीत आयुक्तांच्या दालनाबाहेर धरणे -

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता पाहता, राज्य सरकाराने सर्वच प्रमुख शहरात दिवसा जमाव बंदी आणि रात्रीची संचारबंदी घोषित केली आहे. मात्र भिवंडी शहरात ना कोणाला जमावबंदीचा धाक ना संचारबंदीचा अशी परिस्थिती पाहवयास मिळावी आहे. कोरोनाच्या काळात गर्दी टाळावी यासाठी पालिका प्रशासन ठिकठिकाणच्या रस्त्यात अडथळा ठरणाऱ्या हातगाड्यांवर कारवाई करण्यास सुरुवात करीत आहे. काल दुपारी अचानक गैबिनगर शांतीनगर रस्त्यावर पालिकेने हातगाड्यांवर जेसीबी फिरवला. या अचानक झालेल्या कारवाईने छोटे व्यापारी भाजीपाला, फळ विक्रेते हातगाडी चालक संतप्त होत त्यांनी सायंकाळच्या सुमारास पालिका मुख्यालय प्रवेश दारावर गर्दी करून एकत्रित येत एकच गोंधळ घालत पालिका मुख्यालयात प्रवेश केला. त्यांनतर आयुक्तांच्या दालनाबाहेर धरणे धरीत गोंधळ घातला.

संचारबंदीतच महापौर चषक नावाने रंगले कबड्डीचे सामने -

विशेष म्हणजे दिवसा जमावबंदीत ५ नागरिक एकत्र गटाने राहू शकत नाही. तर रात्रीची संचारबंदी असल्याने नागरिक एकत्र येऊन कुठलाही कार्यक्रम करू शकत नाही. असे असताना काही दिवसांपूर्वी कबड्डीचे सामने महापौर चषक नावाने आयोजित करण्यात आले होते. त्यावेळीही हजारो नागरिक संचारबंदी असताना उपस्थित असल्याची बातमी प्रसारमाध्यांनी प्रसिद्ध केली होती. मात्र त्याची दखल ना पोलीस प्रशासनाने, ना महापालिका प्रशासनाने घेतलेली दिसली. काल सायंकाळी पालिका मुख्यालयात घडलेल्या घटनेवरून दोन्ही शासकीय अधिकारी कोरोनाचा फैलावाकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसत आहे.

दुसऱ्या लाटेत सर्वात आदी कोरोना मुक्त शहर म्हणून गणना -

भिवंडीत लाखो कामगार दाटीवाटीच्या वस्त्यांमध्ये राहतात. त्यामुळे पहिल्या लाटेतच कोरोनाच्या भीतीने लाखो कामगार शहर सोडून मूळगावी गेले होते. त्यांनतर कोरोनाची लाट ओसरल्याने पुन्हा कामगार शहरात दाखल झाले. त्यातच दुसरी लाटेतील अनलॉक कालावधीत भिवंडी शहरातील रुग्ण वाढीचा वेग वाढून मृत्यूदारातही वाढ झाली होती. त्यामुळे शहरवासियांमध्ये चिंतेचे वातावरण असतानाच शासनाने भिवंडीची परिस्थिती हाताळण्यासाठी मालेगावात त्यावेळी प्रभावीपणे कोरोना रोखण्यात यशस्वी ठरलेले महापालिका आयुक्त म्हणून डॉ पंकज आशिया यांची नियुक्ती केली होती. त्यांनी भिवंडीतील कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी चार कलमी कार्यक्रमाची घोषणा करीत प्रभावीपणे अंमलबजाणी केली. त्यामुळे शहर कोरोना मुक्तीच्या मार्गवर येऊन जिल्ह्यातील सर्वात आधी कोरोना मुक्त होण्याचा मान भिवंडी शहराला मिळाला होता. मात्र तिसऱ्या लाटेतील कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. मात्र त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी पालिका प्रशासनाने प्रभावीपणे अंमलबजाणी राबविणे गरजेचे असल्याचे मत नागरिकांकडून व्यक्त केले जात आहे.

हेही वाचा -Bully Bai app case : बुली बाई ॲप प्रकरणातील आरोपी विशाल कुमार झा कडून जामीनासाठी अर्ज

ABOUT THE AUTHOR

...view details