ठाणेदेशाच्या 75 व्या अमृत महोत्सव व स्वराज महोत्सव अंतर्गत आज सकाळी 11 या वेळेत नियोजित सामूहिक राष्ट्रगीत गायन उपक्रमात सर्वांनी सहभागी होऊन एक विक्रम प्रस्थापित करण्याचे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे CM Eknath Shinde आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Deputy CM Devendra Fadnavis यांनी केले होते. या आवाहनाला ठाण्यातील रेल्वे प्रवाशांनी Thane Railway Passengers प्रतिसाद दिलेला पाहायला मिळाला.
राज्य सरकारकडून अपूरी जनजागृती ठाणे रेल्वे स्थानकात ठाणे पोलीस व रेल्वे पोलिसांच्यावतीने सामूहिक राष्ट्रगीताचे National Anthem गायन करण्यात आले. यावेळी स्टेशन परिसरातील रेल्वे प्रवाशांनी आहे त्या ठिकाणी उभे राहून या उपक्रमाला साथ दिली. तर या उपक्रमाबद्दल राज्य सरकारकडून आधी सूचना व जनजागृती केली नसल्याने बहुतांश नागरिकांना याबाबत काहीच माहीत असल्याचे दिसून आले. या उपक्रमाबद्दल राज्य सरकारने दोन दिवस आधीच जनजागृती केली असती तर नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला असता अशा प्रतिक्रिया रेल्वे प्रवाशांनी दिल्या आहेत Inadequate Public Awareness By Government .