ठाणे -ठाकरे सरकारच्या वाझे गँगने मनसुख हिरेन यांची हत्या केली, असा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी भिवंडीत केला आहे. त्यांच्या या विधानाने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. बुधवारी शहरातील कोविड लसीकरण केंद्रांना भेटी देण्यासाठी किरीट सोमय्या भिवंडीत आले होते. त्यावेळी पत्रकारांशी संवाद साधतांना त्यांनी ठाकरे सरकारवर मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात आरोप केला.
पुढे बोलतांना सोमय्या म्हणाले कि, आपण कालचं हिरेन परिवाराची भेट घेतली असून या भेटी दरम्यान हिरेन परिवार प्रचंड तणावात असल्याचे मला आढळले. ठाकरे सरकारच्या वाझे गँगकडून त्यांच्या पत्नी व परिवाराला धमक्या येत आहेत. त्यामुळे हिरेन परिवाराला सुरक्षा पुरविण्यात यावी, अशी विनंती व मागणी लेखी पत्राद्वारे आपण एनआयए यंत्रणा व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे केली असल्याचेही सोमय्या यांनी यावेळी सांगितले. त्याचबरोबर मुंबई पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी अपारदर्शकपणे व घाईघाईने ५ जून २०२० रोजी सचिन वाझे यांना पुन्हा पोलीस सेवेत घेतले यामागे नेमका काय हेतू होता, याची देखील चौकशी व्हावी, अशा मागणीचे पत्र देखील आपण एनआयएला दिले असल्याचे सोमय्या यांनी सांगितले.
सचिन वाझेचा बोलविता धनी देखील तुरुंगात जाणार-