ठाणे -मनसुख हिरेन यांच्या मृत्यू प्रकरणी जैन समाजाने ठाणे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांना पत्र दिले आहे. मनसुख यांची हत्या झाली असून अपहरणकर्ते आणि खुन्यांना तात्काळ अटक करावी आणि हिरेन यांच्या कुटुंबाला संरक्षण द्यावे, अशी मागणी या पत्राद्वारे केली आहे.
मनसुख प्रकरण : अपहरणकर्ते व खुन्यांना तात्काळ अटक करा, जैन समाजाचे पोलीस आयुक्तांना निवेदन - मनसुख हिरेन मृत्यू प्रकरण
मनसुख हिरेन यांच्या मृत्यू प्रकरणी जैन समाजाने ठाणे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांना पत्र दिले आहे. मनसुख यांची हत्या झाली असून अपहरणकर्ते आणि खुन्यांना तात्काळ अटक करावी आणि हिरेन यांच्या कुटुंबाला संरक्षण द्यावे, अशी मागणी या पत्राद्वारे केली आहे.
![मनसुख प्रकरण : अपहरणकर्ते व खुन्यांना तात्काळ अटक करा, जैन समाजाचे पोलीस आयुक्तांना निवेदन मनसुख प्रकरण](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-10950903-756-10950903-1615375235826.jpg)
उद्योगपती अंबानी यांच्या घराबाहेरील सापडलेली स्फोटकांनी भरलेली कार आढळून आली होती. या कारचे मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह मुंब्रा खाडीत आढळून आला होता. त्यांचा खून झाल्याचा संशय त्यांच्या नातेवाईकांनी केला आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यभरात हे प्रकरण गाजले आहे. त्यात आता भाजपच्या अल्पसंख्याक मोर्चाच्या जैन समाजाने एक पत्र ठाणे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांना दिले आहे. मनसुख यांच्या हत्येमुळे जैन समाजामध्ये आक्रोश आहे. पोलिसांनी तात्काळ कारवाई करून खुन्याला आणि अपहरणकर्त्यांना अटक करावी, असे ही या पत्रात नमूद करण्यात आले आहे.