ठाणे- राहुल गांधी म्हणतात गंगा अस्वच्छ आहे, मग प्रियंका गांधींनी गंगेचे पाणी कसे पिले, असा सवाल भाजप खासदार तथा प्रसिद्ध भोजपुरी अभिनेता मनोज तिवारी यांनी केला आहे. ते भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे युतीचे उमेदवार कपिल पाटील यांच्या प्रचारसभेत बोलत होते.
राहुल गांधी म्हणतात गंगा अस्वच्छ, मग प्रियांकांनी पाणी कसे पिले - मनोज तिवारी - मनोज तिवारी
आता एक गोळी घरी चालली तरी बालाकोटपेक्षा पुढे जाऊन कारवाई केली जाईल, असा इशाराही तिवारी यांनी दिला
भिवंडी लोकसभा मतदारसंघात युतीचे उमेदवार कपील पाटील यांच्या प्रचारासाठी उत्तर भारतीय कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता.
खासदार तिवारी म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सैन्याला पूर्ण अधिकार दिले आहेत. आता एक गोळी घरी चालली तरी बालाकोटपेक्षा पुढे जाऊन कारवाई केली जाईल, असा इशाराही तिवारी यांनी दिला.
यावेळी शिवसेनेचे आमदार रुपेश म्हात्रे , भाजपचे आमदार महेश चौगुले , शिवसेना शहर प्रमुख सुभाष माने , भाजपा शहराध्यक्ष संतोष शेट्टी, नगरसेवक सुमित पाटील, गटनेता निलेश चौधरी यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते. या मेळाव्याला उत्तर भारतीयांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.