ठाणे - महिला सहकाऱ्याने लग्नास नकार दिल्याने तिच्यावर चाकूने वार केल्याप्रकरणी येथील एका व्यक्तीविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे (Man stabs colleague for refusing to marry). 27 वर्षीय महिलेवर उपचार सुरू असताना आरोपी योगेश कुमार हा फरार झाला होता, अशी माहिती अधिकाऱ्याने दिली.
लग्नास नकार दिल्याने ठाण्यात एकाने केले सहकारी महिलेवर चाकूने वार, आरोपी फरार - ठाण्यात एकाने केले सहकारी महिलेवर चाकूने वार
लग्नास नकार दिल्याने तिच्यावर चाकूने वार केल्याप्रकरणी येथील एका व्यक्तीविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे (Man stabs colleague for refusing to marry). महिलेने आरोपीला सांगितले होते की तिचे आधीच लग्न झाले आहे. तरीही त्याने तिला कामाच्या निमित्ताने बाहेर घेऊन गेला. तिथेच रागाच्या भरात चाकूने तिच्यावर वार केले. नंतर तिथून पळ काढला.
विवाहित असलेली परंतु गेल्या तीन वर्षांपासून पतीपासून वेगळी राहणारी ही महिला कळंबोली परिसरातील एका फर्ममध्ये काम करते. शीळ-डायघर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सचिन गावडे यांनी बुधवारी ही माहिती दिली. याच कंपनीत काम करणाऱ्या कुमारने तिला आधी लग्नाचा प्रस्ताव ठेवला होता. मात्र महिलेने नकार दिला होता, असे त्याने सांगितले. मंगळवारी त्याने तिला मोटारसायकलवर फिरायला बोलावले आणि उत्तरशिव भागाकडे निघाले. वाटेत त्याने मोटारसायकल थांबवली आणि तिला पुन्हा त्याच्याशी लग्न करण्यास सांगितले.
महिलेने आरोपीला ठामपणे सांगितले की तिचे आधीच लग्न झाले आहे. रागाच्या भरात कुमारने चाकू काढला आणि तिच्यावर वार केला. नंतर तिथून पळ काढला. पोटात आणि चेहऱ्याला दुखापत झालेल्या महिलेने ऑटो रिक्षातून सिव्हिल हॉस्पिटल गाठले, असे पोलीस निरीक्षकांनी सांगितले. भारतीय दंड संहिता कलम 307 (हत्येचा प्रयत्न) अंतर्गत खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा कुमारविरुद्ध दाखल करण्यात आला आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत, असे अधिकाऱ्याने सांगितले.