मुंबई -रविवारी होणाऱ्या विशेष अधिवेशनात विधानसभा अध्यक्षाची निवडणूक होणार असून, या निवडणुकीसाठी महाविकास आघाडी ( Mahavikas Aghadi ) ने शिवसेनेचे आमदार राजन साळवी ( Rajan Salvi ) यांना उमेदवारी दिली आहे. राजन साळवी यांनी आज आपला उमेदवारी अर्ज भरला. यावेळी शिवसेनेकडून अनिल देसाई सुनील प्रभू काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात अशोक चव्हाण आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि दिलीप वळसे पाटील हे उपस्थित होते.
भाजपकडून कोणाला उमेदवारी? -उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शेवटचा अर्धा तास उरला असताना राजन साळवी यांचा उमेदवारी अर्ज महाविकास आघाडीकडून भरण्यात आला. भारतीय जनता पक्षाने विधानसभा अध्यक्षसाठी तरुण आमदार राहूल नार्वेकर ( BJP MLA Rahul Narvekar ) यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे उद्या महाविकास आघाडीकडून राजन साळवी तर भारतीय जनता पक्षाकडून राहऊल नार्वेकर हे विधानसभा अध्यक्षाच्या निवडणुकीत मैदानात असतील.