महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

रेल्वे सुरक्षा यंत्रणा सदृढ करण्याची गरज; महाराष्ट्र रेल्वे प्रवासी महासंघाची मागणी - kalyan railway police

पुष्पक एक्सप्रेसमध्ये दरोडा व २० वर्षीय विवाहित महिलेवर सामूहिक बलात्काराप्रकरणी कल्याण लोहमार्ग पोलिसांनी आतापर्यंत ८ आरोपींना अटक केली आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरिता महात्मा फुले चौक पोलिस ठाण्याने महाराष्ट्र रेल्वे प्रवासी महासंघाचे अध्यक्ष अभिजित धुरत यांना नोटीस बजावली होती.

central railway
रेल्वे सुरक्षा यंत्रणा सदृढ करण्याची गरज

By

Published : Oct 10, 2021, 5:33 PM IST

ठाणे - पुष्पक एक्सप्रेसमध्ये दरोडा व २० वर्षीय विवाहित महिलेवर सामूहिक बलात्काराप्रकरणी कल्याण लोहमार्ग पोलिसांनी आतापर्यंत ८ आरोपींना अटक केली आहे. मात्र, धावत्या ट्रेनमध्ये घडलेल्या या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे. यामुळे महिला प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याबाबत रविवारी महाराष्ट्र रेल्वे प्रवासी संघाच्या पदाधिकाऱ्यांनी कल्याण लोहमार्ग पोलीस व आयपीएसची भेट घेतली आणि घडलेल्या घटनेचा निषेध नोंदवला.

रेल्वे सुरक्षा यंत्रणा सदृढ करण्याची गरज
आरोपींना कठोर शिक्षेची मागणी
या धक्कादायक घटनेनंतर रेल्वे प्रवासी संघाचे अभिजीत धूरत यांनी ही अत्यंत दुर्दैवी आणि महाराष्ट्राला अशोभनीय आहे. याचा निषेध करण्यासाठी आज आलो आहे. रेल्वेमध्ये घडणाऱ्या घटनांमुळे महिला प्रवाशांची सुरक्षा ऐरणीवर आली आहे. त्यामुळे याबाबत विचार होण्याची गरज आहे. आरपीएफ व जीआरपी या सुरक्षा यंत्रणांचे संख्याबळ कमी आहेत. त्यामुळे या यंत्रणा सदृढ करण्याची गरज आहे. तसेच अशा घटनांबाबत रेल्वे प्रवाशांना देखील सतर्क राहण्याची गरज आहे. आरोपींवर कठोर कारवाई व्हावी अशी आमची मागणी असल्याचे सांगितले.


अभिजित धुरत यांना बजावली नोटीस
कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरिता महात्मा फुले चौक पोलिस ठाण्याने महाराष्ट्र रेल्वे प्रवासी महासंघाचे अध्यक्ष अभिजित धुरत यांना नोटीस बजावली होती. पुष्पक एक्सप्रेस दरोडा-अत्याचाराचा निषेध नोंदविण्यासाठी कल्याण येथे सर्वांनी मोठ्या संख्येत उपस्थित रहावे, याबाबत सोशल मिडीयामार्फत आवाहन केले होते. एमएफसी पोलिसांनी या आवाहनाची गंभीर दखल घेतली. लोकांची गर्दी जमून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. तसेच लोक एकत्रित आल्याने समूह संसर्ग होऊन कोरोना विषाणूचा प्रसार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे कोणत्याही प्रकारची गर्दी न जमवता आपण आपल्या मागण्यांसंदर्भात संघटनेच्या शिष्टमंडळासह लोहमार्ग पोलिसांना निवेदन सादर करावे, असा सल्ला दिला. अशा प्रकारच्या कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केल्यास, त्याबाबत जबाबदार धरून आपणाविरुद्ध कारवाई करण्यात येईल असाही इशारा एमएफसी पोलिसांनी महाराष्ट्र रेल्वे प्रवासी महासंघाचे अध्यक्ष अभिजित धुरत यांना दिला.
हेही वाचा -राज्यातील सर्वात सक्षम वन्यजीव पथक म्हणून अमरावतीचा पथकाचा नावलौकिक; शेकडो वन्यप्राण्यांना दिले जीवनदान

ABOUT THE AUTHOR

...view details