ठाणे -महाराष्ट्रात उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Chief Minister Eknath Shinde ) यांच्या राजकीय रस्सीखेच सुरू आहे. एका ठाण्यातीलशालेय आयोजित कार्यक्रमात शिवसेना खासदार आणि उद्धव ठाकरे यांचे समर्थक राजन विचारे यांची पत्नी शिवसेना माजी नगरसेविका नंदिनी राजन विचारे यांनी शाळकरी लहान विद्यार्थ्यांकडुन उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या नावाच्या घोषणा दिल्या असल्याचा प्रकार समोर आला आहे. आता शाळकरी मुलांना देखील वेठीस धरून त्यांच्याकडून उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ घोषणा वदवून घेतल्या असल्याचा संतापजनक प्रकार समोर आल्याने राज्यातील राजकारण ( State politics ) कोणत्या दिशेने जात आहे असा प्रश्न पडल्याशिवाय रहात नाही.
राज्यातील दोन गटातील वाद विकोपाला-एकीकडे शिवसेनेतून बंडखोरी ( Rebel MLA of Shiv Sena ) करत बाहेर पडलेला एकनाथ शिंदे गट शिवसेना पक्षावर निर्विवाद वर्चस्व मिळविण्याचा प्रयत्न करत असतांनाच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ( Shiv Sena chief Uddhav Thackeray ) आपल्या उरलेल्या आमदार, खासदार आणि नगरसेवकांना रोखून धरण्याचे शिवधनुष्य पेलत असल्याचे चित्र संपूर्ण महाराष्ट्र पाहत आहे. त्यातच आता कट्टर शिवसेना समर्थकांनी आपली ताकत दाखविण्याचा प्रयत्न सुरु केल्याने या दोन गटातील वाद किती विकोपाला गेला आहे, ते स्पष्ट दिसत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत ठाण्यातील एका शाळेत उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा देण्यासाठी जाहीर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.