ठाणे -नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे हे काल झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर नॉटरिचेबल झाल्याचे आपल्याला पाहायला मिळाले. परंतु विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर नक्की एकनाथ शिंदे हे कुठे गेले व त्यांच्या सोबतच या आमदारांनी ती खलबत कुठे कुठली गेली, हा प्रश्न सर्व सर्वांनाच पडला आहे. ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधीने याबाबत माहिती घेतली असता असे समोर आले आहे की, याबाबतची सर्व चर्चा ही ठाण्यातील उपवन येथे असलेल्या महापौर बंगल्यामध्ये झाली होती. ( eknath shinde and shiv sena meeting in thane upvan bungalow )
महापौर बंगल्यात केले होते जेवण - आज राज्यात राजकीय भुकंप होत आहे. शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे हे आपल्या सोबत काही आमदारांना घेऊन गुजरातच्या सुरतमध्ये जाऊन बसलेले आहेत. यापूर्वी विधान सभेच्या निवडणूक निकालानंतर ठाण्यातील महापौर बंगला येथे बैठक व जेवणाचा कार्यक्रम झाला होता. यावेळी या सर्व घटनाक्रमाची व पुढील राजकीय भुकंपाची पायामुळे किंवा खलबते कुठल्याची माहिती समोर आली आहे. काल रात्री नगर विकास मंत्री ठाण्यामध्ये असलेल्या महापौर निवास ठिकाणी संपूर्ण आमदारांच्या टीम सोबत चर्चा केली व एकत्र जेवण करून ठाण्याहून गुजरात सुरतच्या दिशेने रवाना झाले. त्यानंतर आज सकाळचा सूर्य उगवताच आपल्याला महाराष्ट्रातील राजकारण यांमध्ये मोठा भुकंप झाल्याचे पाहायला मिळाला. ते म्हणजे महाराष्ट्रातील नगर विकास मंत्री हे शिवसेनेच्या चक्क अर्ध्याहून अधिक आमदारांना घेऊन नॉटरिचेबल झाले. त्यानंतर या सर्व मागण्या आहेत त्या मुख्यमंत्र्यांच्या समोर ठेवण्यात आला व आता याच मागण्यांवर ती या चर्चा सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. परंतु, या सर्वात महत्त्वाचे पाहायचे झाले तर नगर विकास मंत्री यांनी आधीपासूनच अशा प्रकारचे नियोजन केले होते का? किंवा या आमदारांना घेऊन ठाण्यामध्ये आल्यानंतर जेवणाच्या वेळी ह्या प्रकारची खलबते झाली याचे उत्तर नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे देऊ शकतील.