नवी मुंबई- अभिनेत्री कंगना रणौतने मुंबईबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे निर्माण झालेला वाद वाढत आहे. मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरबरोबर केल्याने अभिनेत्री कंगना रणौतवर टीकेची झोड उठत आहे. कंगना रणौत हिने मुंबईची माफी मागावी, तसे न केल्यास तिच्या चित्रपटाच्या सेटला आग लावण्याचा इशारा महाराष्ट्र करणी सेनेच्या अजयसिंग सेंगर यांनी दिला आहे.
कंगनाने मुंबईची माफी मागावी अन्यथा चित्रपटांचे सेट जाळू; महाराष्ट्र करणी सेनेचा इशारा - करणी सेनेचा कंगना रणौतला इशारा
महाराष्ट्र करणी सेनेने कंगना रणौत मुंबई विषयी केलेल्या वक्तव्याबद्दल माफी मागावी, असा इशारा दिला आहे. कंगनाने माफी मागितली नाही तर चित्रपटाचे सेट जाळून खाक करु, असा इशारा देखील देण्यात आला आहे.
सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणात रोज नव-नवीन वक्तव्य करून कायम चर्चेत राहणाऱ्या अभिनेत्री कंगना रणौतने मुंबइची तुलना पाकव्याप्त काश्मीर सोबत केली होती. या वक्तव्यानंतर कंगनावर सर्व स्तरातून टीकेची झोड उठतेय. महाराष्ट्र करणी सेनेचे अध्यक्ष अजयसिंह सेंगर यांनी देखील कंगनाच्या या वक्तव्याचा जाहीर निषेध केला आहे. कंगना ने मुंबईची त्वरित माफी मागावी, अन्यथा पद्मावती चित्रपटाप्रमाणे कंगनाच्या चित्रपटाचे सेट जाळून खाक करू, असा धमकी वजा इशारा अजय सिंह सेंगर यानी दिला आहे.
दरम्यान, अभिनेत्री कंगना रणौतने मुंबईबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे वादळ निर्माण झालं आहे. मुंबईत बोरवली टाटा पावरजवळ शिवसैनिकांनी 'कंगना रणौतचा धिक्कार असो', अशा घोषणा देत पुतळा जाळला.कंगणा रणौतनं मुंबईची तुलना पाक व्याप्त काश्मीरसोबत केल्याने तिच्यावर सोशल मीडियावर टीकेची झोड उठली आहे. काँग्रेस, मनसे, भाजप आणि शिवसेनेकडून तिच्यावर टीका होत आहे.