ठाणे - भारतीय हवामान विभागाने कालपासून कोकण पट्ट्यात ( Heavy rain Thane ) अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. तसेच, यावर्षीही पावसाची सरासरी १०० ते १०५ टक्के राहील असा अंदाज वर्तवला आहे. त्यानुसार यावर्षी पावसाने वेळेवर हजेरी लावली. परंतू, मध्यंतरी दांडी मारली होती. मात्र, सोमवारी दूपारपासून रात्रीपर्यत जोरदार पाऊस कोसळल्याने भिवंडी आणि कल्याण ( Kalyan rain news ) शहरात ठिकठिकाणी सखल भाग पाण्याखाली ( Heavy rain in Kalyan ) जाऊन जलमय झाला होता, त्यामुळे सर्वत्र जनजीवन विस्कळीत झाले होते.
हेही वाचा -VIDEO : नवी मुंबईत मुसळधार पाऊस, खांदेश्वर रेल्वे स्थानकात शिरले पाणी
भिवंडीत मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत -भिवंडी शहर व ग्रामीण परिसरात काल दूपारपासून मुसळधार पाऊस कोसळत होता. दरम्यान यावर्षी नाले सफाईची पहिल्याच पावसाने पोलखोल केली आहे. नाले, गटारातील पाणी रस्त्यावर आले आहे. शहरातील निजामपुरा, कणेरी, कमला हॉटेल, नारपोली, पद्मानगर, तीनबत्ती, शिवाजी नगर, सिटीजन हॉस्पिटल मेनरोड, शास्त्रीनगर, आनंद हॉटेल मागील नाला, वरालदेवी हॉस्पिटल मेनरोड, भाजीमार्केट, नजराना कम्पाउंड आदी सखल भागात पाणी साचले होते. तर, पावसाचे पाणी रस्त्यावर आल्यामुळे कल्याणरोड, अंजूरफाटा, रांजणोली बायपास नाका, माणकोली नाका, वंजारपट्टीनाका, नारपोली, नझराना सर्कल, भिवंडी - वाडा रोडवरील नदीनाका, खाडीपार अशा विविध मार्गांवरील वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडली होती.