ठाणे: शहरी भागासह ग्रामीण क्षेत्रातही आजपासून 10 दिवसांचा लॉकडाऊन
जिल्ह्यातील 6 महानगरपालिका हद्दीत कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता आजपासून 10 दिवसांचा लॉकडाऊन त्या-त्या महापालिका प्रशासनाने घोषीत केला आहे.
ठाणे -जिल्ह्यातील 6 महानगरपालिका हद्दीत कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता आजपासून 10 दिवसांचा लॉकडाऊन त्या-त्या महापालिका प्रशासनाने घोषीत केला आहे. त्या पाठोपाठ ग्रामीण क्षेत्रातही रुग्णांच्या संख्येत वाढ पाहून जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी २ जुलै ते ११ जुलैपर्यंत लॉकडाऊन घोषीत केला आहे.
ठाणे जिल्ह्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असून रुग्णसंख्येत दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात भर पडत आहे. मिशन बिगीन अगेन या आदेशानुसार अनेक प्रकारच्या सवलती सुरु झाल्याने रस्ते, बाजार परिसर व इतर सार्वजनिक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी वाढत आहे. तसेच आरोग्य व्यवस्था, पोलीस विभाग व जिल्हा प्रशासनावर मोठ्या प्रमाणावर ताण पडत असल्याने ग्रामीणमध्येही लॉकडाऊनचे प्रतिबंध पुन्हा लागू करणे आवश्यक झाले होते. त्यामुळे ठाणे जिल्हयातील नगरपरिषद , नगर पंचायत व ग्रामीण क्षेत्रात लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे.