ठाणे :कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता ठाण्यात पुन्हा एकदा लॉकडाऊन करण्यात आले आहे. हा लॉकडाऊन 19 जुलैपर्यंत वाढवण्यात आला आहे. हा लॉकडाऊन ठाणे महापालिका हद्दीपुरता असणार असून अत्यावश्यक सेवा वगळता घरकाम करणाऱ्या व्यक्तींना यातून मुभा देण्यात आली आहे. शुक्रवारी या लॉकडाऊन संदर्भात ठाणे महापाकिकेकडून परिपत्रक काढण्यात आले आहे. त्यामुळे आता पुढील 8 दिवस ठाणे कडकडीत बंद ठेवण्यात येणार आहे.
ठाण्यात पुन्हा लॉकडाऊन वाढवला, 19 जुलैपर्यंत कडकडीत बंद - ठाणे लॉकडाऊन बातमी
ठाणे महानगरपालिकेच्या क्षेत्रातील लॉकडाऊनमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा लॉकडाऊन 19 जुलैपर्यंत वाढवण्यात आला आहे. या लॉकडाऊन संदर्भात ठाणे महापाकिकेकडून परिपत्रक काढण्यात आले आहे. त्यामुळे आता पुढील 8 दिवस ठाणे कडकडीत बंद ठेवण्यात येणार आहे.
ठाणे जिल्ह्यासह महापालिका क्षेत्रात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. कोरोनाचा वाढता प्रभाव बघता लॉकडाऊन वाढवण्यात येईल अशा सूचना काही दिवसांपूर्वी देण्यात आल्या होत्या. दरम्यान ठाण्यात लॉकडाऊन वाढीव संदर्भात चर्चा सुरू असल्याचे ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांच्या वतीने सांगण्यात आले होते. याच पार्श्वभूमीवर ठाणे महापालिका क्षेत्रात 19 जुलैपर्यंत पुन्हा बंद राहणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले.
ठाण्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्येला आटोक्यात आणण्याकरता राज्य सरकार, पालिका प्रशासन तसेच पोलीस वेळोवेळी उपाययोजनेसह झटून काम करत आहेत. कोरोनाची ही साखळी रोखायची असेल तर लॉकडाऊन गरजेचे असल्याने पुन्हा हा लॉकडाऊन करण्यात आलेला आहे. कोरोनाला हरवण्यासाठी ठाणेकरांनी घरी राहावे, योग्य ती काळजी घ्यावी. अतिमहत्त्वाचे काम असेल तरच घरातून बाहेर पडावे, असे आवाहन पालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.