ठाणे - बदलापूरपासून ८ किलोमीटर अंतरावर असलेल्या ढवळे गावातील माळरानात वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना एक बिबट्या मृत अवस्थेत आढळून आल्याची घटना समोर आली आहे. मात्र, मृत अवस्थेत आढळून आलेल्या बिबट्याचे सर्व अवयव सुरक्षित असल्याने भूक बळीमूळे मृत पावला असावा, असा अंदाज वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
बदलापूरच्या माळरानात बिबट्या मृतावस्थेत आढळल्याने परिसरात खळबळ - नैसर्गिक
मृतदेह अत्यंत सडलेल्या अवस्थेत असल्याने त्याच्या मृत्यूचे कारण समजण्यासाठी उशीर लागणार असल्याची माहिती बदलापूरचे वनक्षेत्रपाल रमेश रसाळ यांनी दिली आहे.
गेल्या १० ते १५ दिवसांपूर्वी बिबट्याचा मृत्यू झाला आहे. बिबट्याचे हात, पाय, नखे, आणि दात सर्व अवयव जागेवर आहेत. त्यामुळे बिबट्याचा मृत्यू नैसर्गिक आहे किंवा अन्य कोणत्या कारणांनी झाला आहे. याबाबतचा वैद्यकीय अहवाल वनविभागातर्फे मागवण्यात आला आहे. बिबट्या २ ते अडीच वर्षाचा आहे. मृतदेह अत्यंत सडलेल्या अवस्थेत असल्याने त्याच्या मृत्यूचे कारण समजण्यासाठी उशीर लागणार असल्याची माहिती बदलापूरचे वनक्षेत्रपाल रमेश रसाळ यांनी दिली.
बदलापूर परिसरात असलेल्या ताणवाडी, चमटोली, कोंडेश्वर आदी परिसरात बिबट्या आणि त्याचे २ बछडे दिसत असल्याच्या अनेक तक्रारी वनविभागाकडे आल्या होत्या. मात्र, वनविभागाच्या अधिकाऱ्यांना जंगलात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कधीच बिबट्या दिसला नव्हता. मात्र, गेल्या ५ ते ६ वर्षांपासून बिबट्याचा या भागात वावर असल्याचे अनेकवेळा दिसून आले आहे. मात्र, बिबट्या न आढळल्याने नक्की बिबट्याच्या या भागातील आश्रयाबाबत अनेक तर्कवितर्क काढले जात आहेत.