ठाणे - साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असणाऱ्या दसऱ्याच्या दिवशी वाहन खरेदीला मोठ्या प्रमाणात मागणी असते. यावर्षी अॅटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये मोठ्या प्रमाणात वाहनांची मागणी वाढली असताना, पुरवठा करण्यात न झाल्याने सर्व कंपन्यांच्या वाहनांची मागणी अधिक प्रमाणात वाढली आहे. यामुळेच तीन महिन्यांपासून ते आठ महिन्यांपर्यंत वाहनांची मोठी वेटिंग लिस्ट पाहायला मिळत आहे. ठाण्यातील मोदी हुंडाई या शोरूममध्ये याचे चित्र पाहायला मिळाले आहे.
पुढील वर्षीच्या आठ महिन्यांची वाहनांची बुकिंग -
मागील वर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढल्यानंतर लॉकडाऊन करण्यात आला होता. यामुळे अनेकांच्या नोकऱ्या आणि उत्पन्नावर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला होता. यावर्षी मिशन ब्रिगेडमध्ये वाहनांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आणि मागणीची पूर्तता होत नसल्यामुळे वाहनांच्या वेटिंग लिस्टमध्ये भर पडलेली आहे. ठाण्यातील मोदी होंडाई या शोरूममध्ये होंडाई कंपन्यांच्या गाड्यांसाठी तीन महिन्यांपासून ते आठ महिन्यांपर्यंतची वेटिंग लिस्ट पाहायला मिळत आहे, यावर्षी दसऱ्याच्या निमित्ताने अनेक खरेदीदार ग्राहक पुढील वर्षीच्या आठ महिन्यांची वाहनांची बुकिंग करताना दिसत आहेत.
अचानक वाढली मागणी -