महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Kirit Somaiya Sensational Statement : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना दोन बायका - किरीट सोमय्यांचे खळबळजनक वक्तव्य - ठाण्याच्या लेटेस्ट बातम्या

भाजप नेते किरीट सोमय्या ( BJP leader Kirit Somaiya ) हे कल्याण भाजप जिल्हा कार्यकर्त्याच्या मेळाव्यासाठी आज कल्यामध्ये आले होते. त्यावेळी त्यांनी पुन्हा ठाकरे परिवारावर टीका करताना, खळबळजनक वक्तव्य केले आहे.

Kirit Somaiya
Kirit Somaiya

By

Published : May 15, 2022, 5:55 PM IST

ठाणे:ठाकरे सरकारवर अनेक घोटाळ्याचे आरोप करणारे भाजप नेते किरीट सोमय्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना दोन बायका ( CM Uddhav Thackeray has two wives ) असल्याचे खळबळजनक विधान करून राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. किरीट सोमय्या हे कल्याण भाजप जिल्हा कार्यकर्त्याच्या मेळाव्यासाठी ( Meetings of BJP district workers ) आज कल्याणात आले होते. त्यावेळी त्यांनी पुन्हा ठाकरे परिवारावर टीकेची झोड उठवली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना दोन बायका



भारतीय जनता पार्टी कल्याण जिल्हाच्यावतीने आज (रविवारी ) कल्याण पश्चिम भागातील पारनाका परिसरात असलेल्या अभिनव विद्या मंदिरच्या डॉ. आनंदीबाई गोपाळ जोशी सभागृहात भाजप कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यासाठी माजी खासदार किरीट सोमय्यासह ( Former MP Kirit Somaiya ) भाजप आमदार गणपत गायकवाड,भाजपचे जिल्हा अध्यक्ष शशिकांत कांबळे यांच्यासह भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.



त्या 19 बंगल्याच्या प्रकरणातील दोन पत्रांचा आधार -किरीट सोमय्या यांनी भाजप कार्यकर्त्यांसमोर त्या 19बंगल्याच्या प्रकरणातील दोन पत्रांचा आधार घेत, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना दोन बायका असून यामधील असली रश्मी ठाकरे कोण आणि नकली रश्मी ठाकरे कोण? हे पती उद्धव ठाकरेंनी सांगावे, असे बोलत रश्मी ठाकरे यांच्या नावे असलेल्या त्या 19बंगल्याच्या विषयावर ( 19 bungalows of Rashmi Thackeray ) पुन्हा प्रश्न उपस्थित केले.



खासदार संजय राऊत म्हणजे शिवसेनेचा भोंगा -किरीट सोमय्या यांनी आज पुन्हा शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांच्यावर टीका ( Criticism of Shiv Sena MP Sanjay Raut ) केली, टीका करताना संजय राऊतांना भोंग्याची उपमा दिली. सोमय्या म्हणाले कि, संजय राऊत हे शिवसेनेचे प्रवक्ते अश्याच प्रवक्त्यांना मराठीत भोंगा म्हणतात, हाच भोंगा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या सांगण्यावरून मला शिवीगाळ करत असल्याचा आरोप करत त्यांच्यावर टीका केली आहे.

हेही वाचा -Ketaki Chitale : अभिनेत्री केतकी चितळेची १८ मे पर्यंत पोलीस कोठडीत रवानगी

ABOUT THE AUTHOR

...view details