ठाणे -कौसा मुंब्रा येथील संयुक्त म्हाडा आणि महानगर पालिकेच्या वतीने उभारण्यात आलेल्या कोविड रुग्णालयामध्ये काही वस्तू चोरीला गेल्याचा आरोप गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केला होता. त्यानंतर भाजप नेते किरीट सोमैय्या यांनी याबाबतची माहिती घेऊन आज कोविड सेंटरला भेट देण्यासाठी होते. मात्र कळवा-मुंब्रा पोलिसांनी रेतीबंदर रोड या ठिकाणी त्यांना अडवले. भाजपच्या 5 ते 6 कार्यकर्त्यांंसह सोमैय्या यांना ताब्यात घेऊन कळवा पोलीस ठाण्यात आणण्यात आले.
कोविड रुग्णालयाला भेटीसाठी जाणाऱ्या किरीट सोमैय्यांना कार्यकर्त्यांसह ठाणे पोलिसांनी घेतले ताब्यात - किरीट सोमैय्या
कौसा मुंब्रा येथील संयुक्त म्हाडा आणि महानगर पालिकेच्या वतीने उभारण्यात आलेल्या कोविड रुग्णालयामध्ये काही वस्तू चोरीला गेल्याचा आरोप गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केला होता. त्यानंतर भाजप नेते किरीट सोमैय्या यांनी याबाबतची माहिती घेऊन आज कोविड सेंटरला भेट देण्यासाठी होते. मात्र कळवा-मुंब्रा पोलिसांनी त्यांना चार-पाच कार्यकर्त्यांसह ताब्यात घेतले.
या बंद असलेल्या कोविड सेंटर प्रकरणी पालिकेत भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप सोमैय्या यांनी केला. तसेच कोरोना आणि लॉकडाऊन बाबत ठाकरे सरकारवर देखील टीका करणयात आली.
पालिका प्रशासन चिडीचुप -
राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आणि आता भाजप नेते किरीट सोमैय्या यांनी कोविड रुग्णालयात चोरी झाल्याचे सांगत आहेत. मात्र पालिका प्रशासनाला वारंवार विचारुनही कोणतेही उत्तर देत नाही. साधी चौकशीही आतापर्यंत न लावल्याने नक्कीच कुठेतरी पानी मुरत असल्याचा आरोप ठाणेकर करत आहेत. एकीकडे आयुक्तांना कोविडची बाधा झाली आहे आणि दुसरीकडे प्रशासनावर एवढे मोठे आरोप झाले आहेत. त्यामुळे आता प्रशासन काय उत्तर देणार याकडे, लक्ष लागले आहे.