महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

ठाकरे सरकारला परिस्थितीचे गांभीर्यच नाही-किरीट सोमैयांचे टीकास्त्र - kirit somaiya over Corona situation in Maharashtra

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लॉकडाऊन लागले आहे. राज्यात अत्यंत बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्यात दररोज हजारो नागरिकांचा बळी जात आहे.

kirit somaiya
किरीट सोमैया

By

Published : Apr 19, 2021, 3:42 AM IST

Updated : Apr 19, 2021, 6:51 AM IST

ठाणे -ऐन महामारीत भाजप आणि महाविकास आघाडी सरकारमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरुच आहेत. हॉस्पिटल्समध्ये बेड, ऑक्सिजन आणि औषधांचा प्रचंड तुटवडा भासू लागला आहे. तरीही ठाकरे सरकारला परिस्थितीचे गांभीर्यच नसल्याची सडकून टीका भाजप नेते किरीट सोमैया यांनी केली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लॉकडाऊन लागले आहे. राज्यात अत्यंत बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्यात दररोज हजारो नागरिकांचा बळी जात आहे.

ठाकरे सरकारला परिस्थितीचे गांभीर्यच नाही-

हेही वाचा-महाराष्ट्राच्या मदतीसाठी भारतीय रेल्वेची 'ऑक्सिजन एक्सप्रेस' धावणार

भाजचे माजी खासदार सोमैया यांनी शनिवारी ठाण्यातील सर्वात जुन्या अशा जवाहरबाग स्मशानभूमीला भेट देत परिस्थितीची माहिती घेतली. किरीट सोमैय्या यांच्या माहितीनुसार या एकाच स्मशानभूमीत जानेवारी महिन्यात 33 कोरोनाने मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. फेब्रुवारीमध्ये 24 तर मार्चमध्ये हा आकडा 96 वर गेला. एप्रिलमधील पहिल्या 17 दिवसात तब्बल 390 जणांवर दाहसंस्कार करण्यात आल्याची आकडेवारी पहायला मिळाली. यावरून पालिका प्रशासन देत असलेला मृतांचा आकडा बोगस असल्याचा दावा किरीट सोमौय्या यांनी केला. लोक मरत असताना भ्रष्ट ठाकरे सरकार वाजेच्या मशीनवर पैसे मोजत असल्याचे वादग्रस्त विधानही सोमैय्या यांनी केले आहे.

हेही वाचा-फडवणीस, दरेकर यांच्यावर गुन्हा दाखल करावा का? याची माहिती घेतोय - गृहमंत्री

ठाकरे सरकारने सुरक्षेची पाऊले उचलली नसल्याचा आरोप-

काही ठिकाणी रुग्णांना बेड मिळत नाहीत. तर दुसरीकडे काही कोविड सेंटर्स बंद ठेवण्यात आली असल्याचा विरोधाभास आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची कल्पना असतानादेखील राज्य सरकार अत्यंत बेजबाबदारपणाने वागले आहे. कोणतीही सुरक्षेची पाऊले उचलली नसल्याचा आरोपही त्यांनी केला.

केंद्राकडून राज्य सरकारला सहकार्य नाही-
दरम्यान, राज्यात रेमडेसिवीर आणि ऑक्सिजनचा तुटवडा आहे. याबाबत राज्य सरकार पंतप्रधानांशी बोलत आहे. मात्र, केंद्राकडून राज्याला सहकार्य करताना दिसत नाही, असा आरोप मुंबईचे पालकमंत्री तथा वस्त्रोद्योगमंत्री अस्लम शेख यांनी शनिवारी माध्यमांशी बोलताना केला आहे.

Last Updated : Apr 19, 2021, 6:51 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details