ठाणे -शिळफाटा परिसरातील खिडकाळेश्वर मंदिर तलावात मासे मृत्युमुखी पडल्याने खळबळ उडाली आहे. तलावात फिल्टरेशन प्लान्ट बंद असल्यामुळे आणि केमिकल पाण्यात आल्यामुळे माशांचा मृत्यू झाल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.
ठाण्यातील खिडकाळेश्वर तलावात मृत माशांचा खच - मासे
खिडकाळेश्वर मंदिर तलावात मृत माशांचा खच आढळून आला आहे. हे मासे कोणत्या कारणामुळे मृत झाले याचे कारण अद्यापपर्यंत कळू शकलेले नाही.
तलावातील मृत माशांचा खच
खिडकाळेश्वर मंदिर तलाव, प्रभाग क्रमांक २९ या भागातील तलावात ही घटना समोर आली आहे. या तलावात मृत माशांचा खच पडला आहे. त्यामुळे मृत मासे पाण्यावर तरंगताना दिसत आहेत. खिडकाळेश्वर मंदिर तलावात दशक्रिया विधी, अंघोळ करणे यासारखे प्रकार होत असतात. तसेच तलावाची साफसफाई करण्यात येत नसल्याची माहिती समोर आली आहे. ठाणे महापालिकेने यावर वेळीच उपाय योजना न केल्यामुळे हा प्रकार घडल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.