महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Ketki Chitale Controversy : केतकी चितळेला पुढचे काही दिवस करावा लागणार कोर्ट-कचेरीचा सामना?

केतकी चितळेने केलेली फेसबूक ( Ketki Chitale FB Post ON Sharad Pawar ) पोस्ट तिच्या आयुष्यावर मोठा परिणाम करणारी आहे. कारण तिच्यावर महाराष्ट्रातल्या विविध भागात दाखल झालेल्या सर्वच गुन्ह्यांमध्ये तिला त्रासदायक ठरणार आहे.

Ketki Chitale Controversy
Ketki Chitale Controversy

By

Published : May 18, 2022, 7:42 PM IST

ठाणे -केतकी चितळेने केलेली फेसबूक ( Ketki Chitale FB Post ON Sharad Pawar ) पोस्ट तिच्या आयुष्यावर मोठा परिणाम करणारी आहे. कारण तिच्यावर महाराष्ट्रातल्या विविध भागात दाखल झालेल्या सर्वच गुन्ह्यांमध्ये तिला त्रासदायक ठरणार आहे. कारण या सर्वच गुन्ह्यांमध्ये तिला अटक होऊन जामीन करावा लागणार आहे. ही प्रक्रिया अत्यंत किचकट आणि वेळ खाऊ असल्यामुळे केतकीला अनेक अडचणींना सामोरे जावे लागणर आहे.

रिपोर्ट

पोलिसांचा ससेमिरा केतकीच्या पाठ -राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत केलेल्या फेसबूक पोस्टमुळे सामाजिक भावना दुखावल्याचा आणि बदनामी केल्याचा गुन्हा महाराष्ट्रातल्या अनेक पोलीस ठाण्यात दाखल झाला. अशा प्रकारचे जवळपास 18 गुन्हे महाराष्ट्रात दाखल झाले असून आता केतकीचा ताबा मिळवण्याचा प्रयत्न या सर्वच पोलीस ठाण्यांचा असणार आहे. मात्र, त्यासाठी अटक असलेल्या पोलीस ठाण्यातील न्यायालयाची परवानगी मिळणे, या सर्वच पोलीस ठाण्यांना बंधनकारक असणार आहे. त्यामुळे न्यायालय परवानगी देईल, त्याच पोलिसांना केतकीचा ताबा मिळणार आहे. त्यामुळे एकीकडे पोलीस कोठडी आणि दुसरीकडे न्यायालयीन प्रक्रिया या सर्वांचा ससेमिरा केतकीच्या पाठी लागला आहे.

काय आहे पर्याय -या सर्व बाबी टाळण्यासाठी केतकीकडे एकमेव पर्याय आहे. या सर्व गुन्ह्यांमध्ये केतकीला जर लवकरात लवकर जामीन मिळवायचा असेल, तर तिला हायकोर्टात जाऊन या सर्व गुन्ह्यांना एकत्रितपणे सामोरे जावे लागणार आहे आणि त्यानंतर जामीन मिळवण्यासाठी तिला प्रयत्न करावे लागणार आहेत. मात्र, या सर्व बाबींसाठी देखील वेळ लागणार असल्यामुळे एक फेसबूक पोस्ट केतकीला महाग पडणार आहे.

हेही वाचा -Melghat Water Crisis : मेळघाटातील नागरीक गढूळ पाण्याने त्रस्त; खासदार मात्र हनुमान चालिसा म्हणण्यात व्यस्त

ABOUT THE AUTHOR

...view details