ठाणे - केतकी चितळेवर (Marathi actor Ketaki Chitale) कळंबोली पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या ॲट्रॉसिटी गुन्हाच्या जामीनाबाबत आज ठाणे न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी केतकीचे वकील व सरकारी वकील यांच्यात युक्तिवाद होऊन दोन्ही पक्षांचे म्हणणे न्यायाधीशांनी ऐकून घेतले. या जामीनावर 16 जून रोजी निर्णय (Ketaki Chitale Bail Application) देणार असल्याचे न्यायालयाने सांगितले आहे. यामुळे केतकी चितळे हिची न्यायालयीन कोठडी आता 16 जूनपर्यंत असणार आहे.
केतकीच्या वकिलांचा युक्तिवाद - केतकी चितळे हिच्या विरोधात कळंबोली पोलीस ठाण्यात ऍट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल झाल्यानंतर आज या गुन्ह्यातील जामीन अर्जावर ठाणे न्यायालयात सुनावणी झाली. केतकीचे वकील यांनी न्यायालयासमोर युक्तिवाद करत यावेळी केतकी हिच्यावर जे कलम लावलेले आहेत ते योग्य नसून ते काढावे व या गुन्ह्यात गेल्याच वर्षी चार्जशीट दाखल झाले आहे. परंतु, तेव्हा अटक न करता आता अटक केली आहे. यातून स्पष्ट दबाव असल्याचे दिसून येते, तर पवार नामक फेसबुक पोस्टद्वारे टीका केली होती. या संदर्भात 21 पोलीस स्थानकात गुन्हा दाखल केलेला आहे. एकाच गुन्ह्यासाठी 21 पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद होणे चुकीचे असून, ते गुन्हे काढून टाकावे अशी मागणी या वेळी केतकी चितळे यांचे वकील देशपांडे यांनी केली आहे, तर नवी मुंबई येथे झालेला हल्ला, विनयभंग व शाई फेक, यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केतकी चितळे यांनी केली होती. परंतु, ती परवानगी न देता केतकी चितळेच्या विरुद्ध 21 पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद होतो. यासाठी ही चौकशी सीबीआयकडे देण्यात यावी, अशी देखील मागणी यावेळी वकील देशपांडे यांनी केली आहे.
सरकारी वकिलांचा युक्तिवाद - यावर सरकारी वकील यांनी पोलिसांना तिच्यावर गंभीर गुन्हा आढळून आला. त्यामुळे अटक झाली नाही पण आता शरद पवार यांच्याशी संबंधित पोस्ट आल्यावर पोलिसांनी तिला अटक करण्याचा विचार केला, तर केतकीने अनेकांच्या भावना दुखावल्या आहेत हे माहिती असूनही ही पोस्ट हटवली नाही, कारण हे जाणून बुजून केलेली पोस्ट आहे. केतकीने हेतुपुरस्कर अनुसूचित जाती समुदायाबद्दल वाईट शब्द पोस्ट केली आहे. तिने शरद पवारांवर पुन्हा निशाणा साधला आहे. जे दाखवते की तिला कायद्याची भीती नाही या आधीही तिचे आरोप नाकारले गेले तरी तिने लिहिणे चालूच ठेवले. या सर्व बाबी न्यायालयासमोर मांडत सरकारी वकील यांनी त्यांचा युक्तिवाद केला आहे. उच्च न्यायालयाने केतकी चितळे हिचा जामीन नाकारला आहे. पण आता ठाणे सत्र न्यायालयाने जर जामीन दिला तर उच्च न्यायालयाचा अपमान होईल, असे सरकारी वकील यावेळी न्यायालयात बोलत होते.