महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Ketaki chitale Arrested : शरद पवारांवरील आक्षेपार्ह पोस्ट भोवली, केतकी चितळे पोलिसांच्या ताब्यात

अभिनेत्री केतकी चितेळेने (Marathi actress Ketki Chitale) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विरोधात वादग्रस्त पोस्ट ( Offensive post on Sharad Pawar ) केली. त्यात पवारांवर अभद्र भाषेचा वापर केला होता. केतकीवर सर्वच स्तरातून टीका झाली. त्यातच आता तीला ठाणे गुन्हे शाखेने ताब्यात घेतले (police custody) आहे.

Ketaki chitale
Ketaki chitale

By

Published : May 14, 2022, 5:38 PM IST

Updated : May 14, 2022, 6:01 PM IST

ठाणे:मराठी अभिनेत्री केतकी चितळे (Marathi actress Ketki Chitale) पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार त्यांच्या विरोधात अभिनेत्री केतकी चितळे हिने एक कविता फेसबुकवरुन शेअर केली ( Controversial post against Sharad Pawar ) आहे. त्यानंतर तिच्या विरोधात कळवा येथील पोलीस स्टेशनमध्ये ( Kalwa Police Station ) गुन्हा दाखल करण्यात आला होता तीला ठाणे गुन्हे शाखेने ताब्यात घेतले आहे.

अखेर गुन्हे दाखल :अभिनेत्री केतकी चितळेने फेसबुकवर पोस्ट केलेल्या कवितेनंतर तिच्यावर कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. तसेच पुणे येथेही याच प्रकरणात तीच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यामुळे एकूणच हा वाद ताणला गेला. फेसबुकवर केतकीने केलेल्या पोस्टवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या, तिच्या पोस्टवरील कमेंटमध्ये नवा वाद सुरु झाला. याआधीही केतकी चितळेने छत्रपती शिवरायांवरही केलेली पोस्ट चर्चेत आली होती. त्यानंतर पुन्हा एका बऱ्याच दिवसानंतर केतकी चितळेच्या फेसबुक पोस्टनं वाद उफाळून आलाय. केतकीविरुद्ध कळवा पोलिस ठाण्यात कलम 500, 505(2), 501 आणि 153 A अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इतर ठिकाणीही असेच गुन्हे दाखल झाले आहेत.


सोशल मीडियावर खिल्ली :शरद पवार यांच्यावर रचलेली एक कविता तीने फेसबुकवरुन शेअर केली होती. या कवितेमुळे तिची सोशल मीडियावर अनेकांनी खिल्ली उडवली. शरद पवारांचा अपमान करणारी ही कविता असल्याचे म्हणत पवार समर्थकांनी तिच्यावर टीकाही केली. वेगवेगळ्या वादग्रस्त पोस्टमुळे केतकी चितळे नेहमीच चर्चेत राहत आलेली आहे.

सोशल मीडियावर केतकी ट्रोल: एका कार्यक्रमात कष्टकऱ्यांच्या व्यथा सांगताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी कवी जवाहर राठोड यांची कविता वाचून दाखवली. यानंतर पवारांनी हिंदू देवी देवतांचे बाप काढले, अशी टीका भाजपने केली होती. त्यावर उत्तर म्हणुन केतळी चितळेने पवारांवर अभद्र भाषेत टीका केली होती. त्यामुळे केतकीवर सर्वच स्तरातून टीका होत आहे. सोशल मीडियावर तर केतकीला ट्रोल केलं जात आहे.

Last Updated : May 14, 2022, 6:01 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details