महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

मुलाला भेटण्याच्या ओढीने तुरुंगातून पळालेल्या कैद्याला 24 तासात पुन्हा कोठडी

कल्याणच्या आधारवाडी तुरुंगातून फरार झालेल्या कैद्याला चोवीस तासात गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद करून पुन्हा पोलीस कोठडी दिली आहे. हा कैदी मुलाच्या आठवणीने तुरुंगातून फरार झाल्याचे समोर आले आहे.

By

Published : Jul 26, 2019, 10:34 PM IST

कल्याणच्या आधारवाडी तुरुंगातून फरार झालेल्या कैद्याला चोवीस तासात गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद करून पुन्हा पोलीस कोठडी दिली आहे.

ठाणे - कल्याणच्या आधारवाडी तुरुंगातून फरार झालेल्या कैद्याला चोवीस तासात गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद करून पुन्हा पोलीस कोठडी दिली आहे. हा कैदी मुलाच्या आठवणीने तुरुंगातून फरार झाल्याचे समोर आले आहे. राजेंद्र आदिनाथ जाधव (वय 39) असे या कैद्याचे नाव असून, तो डोंबिवली नजीकच्या कोळेगावचा रहिवासी आहे. संबंधित कैद्याची काही दिवसांनी शिक्षा पूर्ण होणार होती.

कैदी राजेंद्र जाधव याला गुरुवारी दुपारच्या सुमारास तुरुंगाच्या आवारातील झाड लोड करण्यासाठी सुरक्षा रक्षकाने आवारात आणले होते. याच संधीचा फायदा घेऊन त्याने धूम ठोकली. नंतर तुरुंग प्रशासनाच्या तक्रारीनुसार त्याच्याविरुद्ध खडकपाडा पोलीस ठाण्यात फरार झाल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आणि पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली.

कल्याणच्या आधारवाडी तुरुंगातून फरार झालेल्या कैद्याला चोवीस तासात गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद करून पुन्हा पोलीस कोठडी दिली आहे.

कैदी शुक्रवारी सकाळी बदलापूर पाईपलाईन रस्त्यावरील कोळेगाव सर्कल येथे येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर कल्याण गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जॉन यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने या परिसरात जाळे पसरले. मात्र, पोलिसांनी सापळा लावल्याचा संशय आल्याने राजेंद्रने धूम ठोकली. त्यानंतर पोलिसांनी पाठलाग करून त्याला जेरबंद केले.

चौकशीदरम्यान, या कैद्याच्या विरोधात डोंबिवलीच्या टिळकनगर आणि कल्याणच्या महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात रिक्षा चोरीचे गुन्हे दाखल आहेत. याच गुन्ह्यांच्या आरोपाखाली कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाने त्याला दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती.

दरम्यान, यापूर्वीही दोन सराईत गुन्हेगारांनी आधारवाडी तुरुंगातून केबलच्या साहाय्याने भिंतीवर चढून पळ काढला होता. यामुळे तुरुंग सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details