महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

कल्याण-डोंबिवली 'थर्ड स्टेज'च्या उंबरठ्यावर; तरीही लोक ऐकेनात

कोरोनाचा वाढता प्रादुभाव पाहता कल्याण-डोंबिवली शहरे 'थर्ड स्टेज'च्या उंबरठ्यावर गेली आहेत. त्यामुळे प्रशासनाकडून सातत्याने नागरिकांना घरातच आवाहन केले जात आहे. असे असतानाही नागरिक ऐकायला तयार नाहीत.

Kalyan‑Dombivli Municipal Corporation
कल्याण डोंबिवली महानगरपालिका

By

Published : Apr 3, 2020, 5:44 PM IST

ठाणे - कोरोनाचा वाढता प्रादुभाव पाहता कल्याण-डोंबिवली शहरे 'थर्ड स्टेज'च्या उंबरठ्यावर गेली आहेत. त्यामुळे प्रशासनाकडून सातत्याने नागरिकांना घरातच आवाहन केले जात आहे. असे असतानाही नागरिक ऐकायला तयार नाहीत. तसेच अद्यापही लोक रस्त्यावर विनाकारण फिरत असल्याबद्दल कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

खासदार श्रीकांत शिंदे

हेही वाचा...कोरोनाशी कर सुरु लढाई..! जनजागृतीसाठी 'ईटीव्ही भारत'चे खास मराठी गीत

कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात कोरोनाग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढून 21च्या घरात गेली आहे. या पार्श्वभूमीवर खासदार श्रीकांत शिंदे यांनी पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या दालनात कोरोनाशी लढा देण्यासाठी तातडीने काय उपाययोजना करता येतील, याविषयी बैठक आयोजित केली होती. यावेळी ठाणे सिव्हील रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. कैलास पवार, एमआयएचे डॉक्टरांच्या पथकासह खासगी रुग्णालयातील अनेक डॉक्टर उपस्थित होते.

हेही वाचा...कोरोनाचे संकट अधिकच धोकादायक बनतेय, याविरुद्ध लढण्यासाठी एकत्र येणे आवश्यक - WHO

या बैठकीनंतर माध्यमांसोबत बोलताना शिंदे यांनी, 'कोरोना आजाराची सामना करण्यासाठी डोंबिवलीतील महापालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात पूर्णतः कोरोना बधितांवर उपचारासाठी सज्ज केले आहे. त्याचबरोबर शहरातील मोठी खासगी रुग्णालयांसोबतदेखील करारनामा करून या रुग्णालयांमध्ये कोरोनाग्रस्तांवर उपचार करण्यात येणार आहे' अशी माहिती त्यांनी दिली आहे.

दरम्यान, डोंबिवलीत पार पडलेल्या 'त्या' लग्न सोहळा व हळदी समारंभामुळे कल्याण-डोंबिवली शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याचेही शिंदे यांनी सांगितले. तसेच कल्याण-डोंबिवली शहरे 'थर्ड स्टेज'मध्ये गेली आहेत. त्यामुळे प्रशासनाकडून नागरिकांना घराबाहेर पडू नका, असे वारंवार सांगूनही लोक ऐकायला तयार नाहीत. विनाकारण रस्त्यावर फिरत असल्याची नाराजी शिंदे यांनी व्यक्त केली. तर नागरिकांनो घरात रहा, घराबाहेर पडू नका, अन्यथा यापुढे तुम्हाला रुग्णालयातच राहावे लागेल. असा हात जोडून विनंती वजा इशाराही त्यांनी नागरिकांना दिला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details